Friday, April 26, 2024
Homeनाशिकराज्यकर्त्यांच्या नाण्यातून संस्कृती, नद्यांचे दर्शन : राजापूरकर

राज्यकर्त्यांच्या नाण्यातून संस्कृती, नद्यांचे दर्शन : राजापूरकर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आपल्या भारताला 2500 वर्षाची समृद्ध अशी संस्कृती लाभलेली आहे. त्या त्या काळातील राज्यकर्त्यांच्या नाण्यातून ( coin of rulers ) त्या त्या काळातील संस्कृतीचे तसेच नद्यांचे दर्शन ( View of culture as well as rivers )आपल्याला घडल असते.असे प्रतिपादन प्राचिन नाणे संग्रहक व संशोधक ( Ancient coin collectors and researchers ) चेतन राजापूरकर ( Chetan Rajapurkar ) यांनी केले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालय, पुरातत्व विभाग व नाशिक इतिहास संशोधन मंडळ ( Nashik History Research Board ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नदी महोत्सवात ‘प्राचिन नाण्यांमधील नदी’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दर्शनिका विभाग महाराष्ट्र शासनचे संचालक डॉ.दिलीप बेलसेकर होते. प्रमुख पाहूणे म्हणून नाणे अभ्यासक अण्णा भार्गवे उपस्थित होते.

राजापूरकर पुढे म्हणाले नदी संस्कृती आपन हा शब्द आपण अनेक वेळा ऐकल असतो खरच नदीला संस्कृती असते का ? होय खरे आहे प्रत्येक नदीला एक वेगळी अशी संस्कृती असते किंबहुना प्राचीन काळातील प्रत्येक संस्कृती नदी किनारीच निर्माण झाल्यास व समृद्ध ही झाल्यात आणि कालौघात त्या संस्कृती लुप्त ही झाल्यात मात्र प्राचीन नाणे अश्या लुप्त झालेल्या संस्कृतीचा पाऊलखुणा आपल्याला दाखवत असतात.प्राचीन नाण्यांमुळे त्यात्या काळातील राजे शहरे नगरे तेथील संस्कृतीचा अभ्यास करणे शक्य होते म्हणूनच प्राचीन नाण्यांना इतिहास संशोधनाचे प्रमुख साधन म्हटले जाते असेही ते म्हणाले.

प्रत्येक नदी आपल्या भोवती एक वेगळी अशी संस्कृती बनवली आहे. गिरणा आणि गोदावरी नद्या अगदी जवळ जवळ मात्र दोघांच्याही संस्कृती वेगवेगळ्या होय आणि ते खरंय एकूणच प्रत्येक नदीने मनुष्याचे जीवन मान समृद्ध केलेले आहे म्हणूनच नदी ही सुजलाम सुफलाम याचे प्रतीक मानली गेलेली आहे म्हणूनच नदी अथवा जलचरांचे चिन्ह शुभ चिन्ह प्राचीन नाण्यांवर तसेच धार्मिक विधीत वापरले गेले आहेत.

प्राचीन काळापासून आजही प्रत्येक धार्मिक विधीत नदीला विशेष स्थान दिले जाते प्रत्येक धार्मिक विधीत मंत्रोच्चारानदीला धार्मिक विधीत नदीला बोलावले जाते अगदी विवाह विधीत देखील सप्तानदीना साक्षीला ठेऊन विवाह लावले जातात. एकंदरीत नदी आणि त्या त्या काळातील मनुष्याच्या धार्मिक भावना जोडल्या गेल्याने प्रत्येक मनुष्यावर नदीचा अत्यंत प्रभाव दिसून येत आहे.

प्राचीन काळी राज्यकर्त्यांनी नदीचे महत्व लक्षात घेऊन नदीला सुजलाम सुफलामचे प्रतीक म्हणून आपल्या नाण्यांवर स्थान दिले व नदी संवर्धनाची गरज बघता नदी देवतेचे चिन्ह नाण्यांवर अंकित करून त्याला धार्मिकतेची जोड दिली आहे.एकंदरीत त्या त्या काळातील राज्यकर्त्यांनी नदी संवर्धनाबाबत संदेश देण्यासाठी एक महत्त्वाचे प्रभावी साधन म्हणून त्या त्या काळातील नाण्यांवर नदी देवतेच्या चिन्हाचा वापर करून ते नाणे चलनात आणले असल्याचे दिसून येते असेही राजापूरकर यांनी स्पष्ट करताना दृकश्राव्य माध्यमातुन विविध नाण्यांची माहीती उलगडून दाखविली.

- Advertisment -

ताज्या बातम्या