Saturday, April 27, 2024
Homeनगर‘स्वच्छ’ मतासाठी सीएसआरडी नगरकरांच्या भेटीला

‘स्वच्छ’ मतासाठी सीएसआरडी नगरकरांच्या भेटीला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर स्वच्छतेबाबत (City Cleanliness) नागरिकांचे मत नोंदविण्याठी (Register the vote of the Citizens) आता सीएसआरडी कॉलेजचे विद्यार्थी (CSRD Student) शहरात घरोघरी भेट देणार आहेत, अशी माहिती उपायुक्त यशवंत डांगे (Deputy Commissioner Yashwant Dange) यांनी दिली.

- Advertisement -

स्वच्छ सर्वेक्षण 2022 (Clean Survey 20220 अंतर्गत शहरात फाईव्ह स्टार (Five Star) मानांकनासाठी विविध उपयोजना केल्या जात आहेत. दोन वर्षांमध्ये पदाधिकारी व अधिकार्‍यांकडून स्वच्छतेचे काम सुरू आहे. याआधी थ्री स्टार (Three Star) मानांकन प्राप्त केले असून आता फाईव्ह स्टार या मानांकनाकडे वाटचाल सुरू आहे. त्यासाठी नगरकरांना आपले मत नोंदविण्याची संधी अ‍ॅप किंवा बारकोडद्वारे मिळत आहे.

आतापर्यंत 12 हजार नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. आता सीएसआरडी कॉलेजचे विद्यार्थी (CSRD Student) शहरात घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबत नागरिकांचे मत नोंदविणार आहे, असे डांगे यांनी सांगीतले.

पूर्वी शहरात कचराकुंड्या होते. त्यात मोकाट जनावरांचा मुक्त वावर होता कचर्‍याची दुर्गंधी प्लॅस्टिक पिशव्यांचा अतिवापर हे चित्र कायम असायचे. आता मात्र शहर कचराकुंडी मुक्त झाले. दारोदारी घंटागाडी दिसू लागल. घंटा गाडी आली हो घंटा आली गाडी आली हे गीत वाजू लागल्यानंतर चौका चौकातील कचर्‍याचे ढीग नाहीसे झाले. नागरिकही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देऊ लागले. प्लास्टिकचा वापर कमी झाला, असा दावा त्यांनी केला.

ओला-सुका कचरा वेगळा करणे बाबत अद्याप नागरिकांकडून काहीसा प्रतिसाद मिळत नसला तरीही याबाबत जनजागृती होत आहे. याचाच परिणाम म्हणून या वर्षी मनपा प्रशासन पदाधिकारी देशात पहिल्या दहात मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यावर्षी फाईव्ह स्टार मानांकन मिळवण्यासाठी काम चालू आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून नागरिकांना सर्वेक्षणांमध्ये भाग घेता येणार आहे ते अ‍ॅप किंवा बारकोडच्या मदतीने आपली मते नोंदवू शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या