Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedचौकांचे सौंदर्यीकरण कंपन्यांच्या 'सीएसआर'वर

चौकांचे सौंदर्यीकरण कंपन्यांच्या ‘सीएसआर’वर

औरंगाबाद – aurangabad

शहर विकासासाठी सीएसआर निधी (CSR Fund) उभा करण्यासाठी महापालिकेने (Municipality) सीएसआर वेब पोर्टल सुरू केले आहे. मात्र या पोर्टलला अजून प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे आता महापालिकेने सीएसआर निधीसाठी थेट उद्योजकांच्या दारी जाण्याचे ठरवले आहे. उद्योजक, सामाजिक संस्थांशी प्रत्यक्ष संपर्क साधून शहर सौंदर्यीकरण व विकासासाठी त्यांच्याकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. 

- Advertisement -

औरंगाबाद महापालिकेने शहरातील प्रमुख चौक, रस्ता दुभाजक, उद्याने आदी ठिकाणी सुशोभीकरण, सौंदर्यीकरणाची कामे करण्यासाठी उद्योजक ब सामाजिक संस्था सीएसआर निधी अंतर्गत सहकार्य मागवले होते. त्यास काही प्रमाणात प्रतिसादही मिळाला. मात्र ‘पालिकेतील काही धोरणी अधिकार्‍यांनी यात फारसा रस न दाखवल्यामुळे महानगरपालिकेचा प्रयत्न फसला. महानगरपालिकेला शासनाकडून मिळणारा निधी कमी प्रमाणात असल्यामुळे आणि आर्थिक बजेटमध्ये देखील सुशोभीकरण, सौंदर्यीकरणाच्या कामावर विशेष तरतूद करणे शक्‍य होत नसल्याने महापालिकेने सीएसआर फंडातून निधीसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. या कामात पारदर्शकता यावी, यासाठी प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सीएसआर पोर्टल तयार केले. या पोर्टलचे काम स्मार्ट सिटीच्या मदतीने करण्यात आले. मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी यांना यासाठी नोडल ऑफिसर म्हणून नेमले आहे. त्यांच्या मदतीला अन्य दोन अधिकारी देखील दिले आहे. ज्या उद्योजकांना, सामाजिक संस्थांना शहरातील विकासकामांसाठी, सौंदर्यीकरणासाठी निधी देण्याची इच्छा आहे, त्यांनी सीएसआर पोर्टलवर जाऊन त्याची नोंद करावी. महापालिका आणि स्मार्ट सिटीचे व्यवस्थापन त्याची दखल घेवून त्या उद्योजक किंवा सामाजिक संस्थेशी संपर्क करेल आणि पुढील कार्यवाही केली जाईल, असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.

मूळात पालिकेने पोर्टल सुरू केले खरे, मात्र त्याची जनजागृतीच केलेली नाही. त्यामुळे शहरातील अनेक संस्था, कंपन्यांना याची कल्पना देखील नाही, त्यामुळे सीएसआर पोर्टलला कसा प्रतिसाद मिळत आहे, याविषयी प्रशासक डॉ. चौधरी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता पालिका स्मार्ट सिटीचे अधिकारी थेट उद्योजकांकडे जातील, त्यांना विकासकामांसाठी, सौंदर्यीकरणासाठी निधी देण्याची विनंती करतील. यास प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास देखील त्यांनी व्यक्‍त केला,

- Advertisment -

ताज्या बातम्या