Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाIPL 21 : मुंबईसमोर पंजाब किंग्जचे आव्हान

IPL 21 : मुंबईसमोर पंजाब किंग्जचे आव्हान

चेन्नई | Chennai

आयपीएल २०२१ मध्ये आज शुक्रवारी पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

आयपीएल २०२१ हंगामात आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघाना विजय आवश्यक असणार आहे. मुंबई संघ गुणतालिकेत सध्या चौथ्या तर पंजाब संघ सातव्या स्थानावर आहे.

मुंबईवर मात करून विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब किंग्ज सज्ज आहे. तर पंजाबवर मात करून चेन्नई मैदानावरील आपल्या अखेरच्या सामन्यात विजय संपादन करण्यासाठी मुंबई सज्ज आहे. मुंबईने या मैदानावर आतापर्यंत ४ सामने खेळले असून, यात त्यांना २ विजय आणि २ पराभव पत्कारावे लागले आहेत.

मुंबई संघाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास यामध्ये सातत्याचा अभाव दिसून आला आहे. सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा वगळता संघातील एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

त्यांना आपली कामगिरी सुधारण्याची संधी मिळणार आहे. तर मुंबईच्या गोलंदाजीत सातत्य दिसून आले आहे. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर फॉर्मात आहेत. त्यांना आपली कामगिरी अशीच कामगिरी उंचावण्याची संधी आहे.

पंजाब संघाबद्दल बोलायचे झाले तर लोकेश राहुल, मयंक अगरवाल, दीपक हुडा चांगली फलंदाजी करत आहेत. ही पंजाब संघासाठी जमेची बाजू आहे. तर चिंतेची गोष्ट म्हणजे क्रिस गेल, निकोलस पुरण अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यामुळे आघाडीचे दोन्ही फलंदाज लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल या दोघांवरील दडपण वाढत आहे.

क्रिस गेलच्या फलंदाजीतील अपयशाने पंजाब संघाच्या चाहत्यांमध्ये क्रिस गेलची बॅट कधी तळपणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चेन्नईची खेळपट्टी संथ असल्यामुळे येथे नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरतो आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला दोन्ही कर्णधार पसंती देतील यात शंका नाही. कारण धावांचा पाठलाग करताना खेळपट्टी आपला रंग बदलते याचा प्रत्यय मागील काही सामन्यांमध्ये दिसून आला आहे. दोन्ही संघाच्या गोलंदाजीवर नजर टाकल्यास मुंबईची गोलंदाजी अधिक सरस दिसून येत आहे.

मुंबई संघाच्या फलंदाजीची मदार रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, क्रिस लीन, सूर्यकुमार यादव , ईशान किशन, सौरभ तिवारी, आदित्य तारे, यांच्यावर असणार आहे.

अष्टपैलूंमध्ये किरॉन पोलार्ड, जेम्स निशम, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, नेथन कुलतेर्नेल आहेत. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, पियुष चावला, राहुल चाहर आहेत.

पंजाब संघाच्या फलंदाजीची मदार लोकेश राहुल, मयंक अगरवाल, क्रिस गेल, निकोलस पुरण, डेविड मलान, शाहरुख खान, सार्फराझ खान आहेत.

अष्टपैलूंमध्ये मंदीपसिंग , मोझेस हेन्रीक्स, दीपक हुडा, क्रिस जॉर्डन, फेबियन अलेन, झाये रिचडसन, जलाज सक्सेना आहेत. गोलंदाजीत क्रिस जॉर्डन, ईशान पोरेल, रवी बिष्णोई, मोहंमद शमी, दर्शन नळकांडे आहेत.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या