Friday, April 26, 2024
Homeनाशिकसीएसईईटी परीक्षा 13 नोव्हेंबरला

सीएसईईटी परीक्षा 13 नोव्हेंबरला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

‘द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया’ The Institute of Company Secretaries of India’ मार्फत (आयसीएसआय) घेतली जाणारी कंपनी सेक्रेटरी एग्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (सीएसईईटी) परीक्षा CSEET exam येत्या 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ऑनलाइन होणार्‍या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

- Advertisement -

‘आयसीएसआय’ मार्फत सीएसईईटी ही परीक्षा 13 नोव्हेंबरला देशभरात ऑनलाइन घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या माध्यमातून ही परीक्षा देता येणार आहे. परंतु, स्मार्टफोन किंवा टॅबलेटचा वापर परीक्षा देण्यासाठी करता येणार नाही. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी नोंदणी करता येणार आहे.

परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर ते तपासूनकाही चुकीची महिती आढळल्यास तातडीने CSEETicsi.edu.in या इमेल आयडीवर संपर्क साधण्याची सूचना ‘आयसीएसआय’ने दिल्या आहेत. बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असलेल्या या परीक्षेसाठी उमेदवारांना दोन तासांचा वेळ दिला जाणार असून, 200 गुणांसाठी 140 प्रश्न सोडवावे लागणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या