Thursday, April 25, 2024
Homeजळगावबऱ्हाणपुर-अंकलेश्वर महामार्गावर क्रुझरचा अपघात ; दहा जण गंभीर

बऱ्हाणपुर-अंकलेश्वर महामार्गावर क्रुझरचा अपघात ; दहा जण गंभीर

यावल – प्रतिनिधी

तालुक्यातील हिंगोना गावाजवळ बुरहानपुर अंकलेश्वर रस्त्यावर अडावद होऊन बऱ्हाणपूर कडे जाणाऱ्या मोह हरदा येथील MP09 BC 3608 या गाडीमध्ये दहा जण एका कार्यक्रमासाठी गेले होते हे हिंगोना गावाजवळ भरधाव वेगात गाडीवरील ताबा ड्रायव्हरचा गेल्यामुळे ड्रायव्हर साईडला ही गाडी आऊटसाईड पलटी झाली.

- Advertisement -

या अपघातात ड्रायव्हर सह नऊ जण जखमी झाले असून एक गंभीर अवस्थेत आहे जखमींना परिसरातील नागरिकांनी तात्काळ सावदा येथे खाचणे हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी हलवण्यात आले असून याठिकाणी मदतकार्य सुरू आहे.

फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन जखमींना त्याठिकाणी हलवण्याचे कामात मदत केली आहे याच जागेवर काही अंतरावर गेल्या वर्षी चिचोली मेहून येथील एका गाडीला राख वरुन जाणाऱ्या डंपरने जबर ठोस दिली होती त्यात दहा ते अकरा जण दगावले होते त्या परिसरात ही घटना घडली असून हिंगोना सांगवी भालोद परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली

- Advertisment -

ताज्या बातम्या