Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रDrug case : आर्यन खानचा जामिनावर आता उद्या निर्णय

Drug case : आर्यन खानचा जामिनावर आता उद्या निर्णय

मुंबई l Mumbai

अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) जामीन अर्जावर आता उद्या २८ ऑक्टोंबर रोजी निर्णय होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात आजची सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर आता उद्या निर्णय होणार आहे.

- Advertisement -

क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर (Bail Application) मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष एनडीपीएस कोर्टात (NDPS Court) सुनावणी झाली होती. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेता यांचाही जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर आर्यनने उच्च न्यायालयात दाद मागितली.

‘तारीख पे तारीख, तारीख पे तारीख’ हा सिनेमामधील डायलॉग बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या वाट्याला आला आहे.

आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी बुधवारी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक माहिती देतानाच आर्यन खान कसा निर्दोष आहे हे कोर्टासमोर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

गेल्या २० दिवसांपासून आर्यन खान क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत आहे. आर्यनला ३ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असून मुंबईच्या आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या