Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशकच्चे तेल सात वर्षांचा उच्चांकावर, पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी वाढणार?

कच्चे तेल सात वर्षांचा उच्चांकावर, पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी वाढणार?

जगभरात ओमियक्रॉन (Omicron) ची चिंता कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमती (Crude Oil price) सातत्याने वाढत आहे. सध्या कच्च्या तेलाचे भाव वाढून ८७ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या सात वर्षांतील हे सर्वात जास्त दर आहेत. साप्ताहिक आधारावर हा ५ वा आठवडा असून त्यात तेलाच्या किमती खूप वाढल्या आहेत. यापुर्वी २०१४ मध्ये कच्चे तेल ८७ डॉलरवर गेले होते. (Crud Price Hike)

st strike : ‌ एसटी कामगारांना धक्का, न्यायालयाने ठरवला संप बेकायदेशीर

- Advertisement -

आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ९० डॉलरपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे येत्या महिनाभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन ते तीन रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. १ डिसेंबर २०२१ मध्ये कच्च्या तेलाचे भाव ६९ डॉलर प्रति बॅरल होते. ते आता ८७ डॉलरवर गेले आहे. म्हणजेच फक्त सहा आठवड्यात कच्चे तेलाच्या भावात २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Video मुख्यमंत्र्यांसाठी वाहतूक थांबवली, सीएमने फटकारले, म्हणाले…कोणी राजे आलेत का?

तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पाच राज्यातील निवडणुकीनंतर वाढू शकतात. सध्या निवडणुकीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकारकडून वाढ केली जात नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या