Friday, April 26, 2024
Homeजळगावआरास, देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

आरास, देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

संपुर्ण राज्यासह देशभरात गणरायाची मोठ्या जल्लोषात स्थापना (Ganaraya’s establishment in jubilation) करण्यात आली. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडून विविध प्रकारच्या आरास (scenery and scenery) साकारण्यात आल्या आहे. दरम्यान, आरास साकारण्याचे काम पुर्ण झाले आहे. त्यातच शनिवार व रविवार शासकीय कर्मचार्‍यांना सुट्टी असल्याने मंडळांकडून साकारण्यात आलेल्या आरास व देखावे पाहण्यासाठी भाविकांनी (Devotees)मोठ्या प्रमाणात गर्दी (crowd) केली होती.

- Advertisement -

कोरोनामुळे दोन वर्षांपासून सर्व सण, उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले होते. परंतु यंदा शासनाने कोरोनामुळे लावलेले सर्व निर्बंध शिथील केल्यामुळे गणेशोत्सव मोठ्या जल्लोषपुर्ण वातावरणात साजरा केला जात आहे. लाडक्या गणरायाचे तीन दिवसांपुर्वीच मोठ्या उत्साहपुर्ण भक्तीमय वातावरणात आगमन झाले आहे. यंदा सर्वच सार्वजनिक मंडळांडून भव्यदिव्य आरास देखील साकारण्यात आल्या आहे. आरास साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून अनेक मंडळांचे आरास साकारण्याचे काम पुर्ण देखील झाले असून भाविकांना देखील देखावे पाहण्याची आस लागली होती. दरम्यान, आज सायंकाळपासून भाविकांनी रस्त्यांवर गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर गर्दी दिसून आली

सुट्टीमुळे भाविकांची मांदियाळी

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून साकारण्यात आलेल्या आराचे काम पुर्ण झाले आहे. त्यातच शनिवारी व रविवारी दोन दिवस शासकीय कर्मचार्‍यांना सुट्टी असल्याने दोन दिवस भाविकांची आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणाणत गर्दी झाली होती.

परिसरात चैतन्याचे वातावरण

दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या धूमधडक्यात साजरा केला जात आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह खेळणे विक्रेत्यांनी ठिकठिकाणी दुकाने थाटली असल्याने संपुर्ण परिसर गजबजलेला होता.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

सर्वच मंडळांकडून यंदा भव्यदिव्य अशा विविध प्रकाराच्या आरास साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील भाविक आरास पाहण्यासाठी शहरात आले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या