Thursday, April 25, 2024
Homeनाशिकलॉन्समध्ये गर्दी; नियम धाब्यावर

लॉन्समध्ये गर्दी; नियम धाब्यावर

जुने नाशिक । Old Nashik (प्रतिनिधी)

परिसरात मागील काही दिवसांपासून लहान-मोठे लग्नकार्य, साखरपुडा तसेच वाढदिवसाचे कार्यक्रम विविध लॉन्स मध्ये सुरू झाले आहेत, मात्र याठिकाणी करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे काही लॉन्स चालक मुख्य प्रवेशद्वार बंद करून आत मध्ये कार्यक्रम करत असल्याचे लक्षात आले आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहेत.

सध्या करोनाची परिस्थिती आटोक्याबाहेर जात आहे. अशा वेळी केंद्र तसेच राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन होणे गरजेचे आहे. तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीने देखील शहर परिसरातील व्यावसायिक प्रतिष्ठाण सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

मात्र दुसरीकडे काही लॉन्स मध्ये सर्रास मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन लग्नकार्य तसेच साखरपुडा इतर कार्यक्रम होत असल्याचे समोर आले आहेत. अशा वेळी व्हायरस पसरण्याची भीती जास्त झाली आहे.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रशासनाने लॉन्स चालकांना तंबी देऊन निवडक लोकांमध्ये कार्यक्रम आटोपून घेण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी दक्ष नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या