Friday, April 26, 2024
Homeनाशिकभाऊबीजेनिमित्त बस स्थानकांवर गर्दी

भाऊबीजेनिमित्त बस स्थानकांवर गर्दी

सिन्नर | Sinnar

करोनाच्या संकटात बंद झालेली एस.टी. सेवा पुन्हा सुरु झाली असली तरी प्रवाशांअभावी तालुक्यातील अनेक फेर्‍या बंद कराव्या लागल्या होत्या.

- Advertisement -

मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मामाच्या गावाला जाणा्रया मुलांसोबत माहेरवाशिणींनी एस.टी. लाच प्राधान्य दिले असून सहा-सात महिण्यानंतर पहिल्यांदाच सिन्नर बसस्थानक गर्दीने फूलू लागले आहे.

मार्च महिना संपता-संपता केंद्र शासनाने देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर एस.टी. ची चाके थांबली होती. प्रवासी वाहतूकीऐवजी माल वाहतूकीकडे एस.टी. चा प्रवास सुरु झाला होता. मात्र, शासनाने टप्प्या-ट्प्प्याने लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्यानंतर एस.टी. पुन्हा सुरु झाली होती.

नाशिकसारख्या शहराकडे धावणार्‍या बसेस प्रवाशांनी खचाखच भरुन जातांना दिसू लागल्या होत्या. मात्र, ग्रामीण भागातून एस.टी. च्या सुरु केलेल्या फेर्‍या प्रवाशांअभावी रद्द करण्याची वेळ आगारावर आली होती. दिवाळीच्या निमित्ताने एस.टी. ला पुन्हा पहिले दिवस येऊ शकतात असे दिलासादायक चित्र दिसू लागले आहे. दिवाळी हा खरं तर महिलांचा सण.

सासूरवाशीणी भाऊबिजेला माहेरी जाऊन भाऊरायाला ओवाळतात. त्यांच्या बरोबर बच्चे कंपनीही मामाच्या गावाला जाते. माहेरी जाणार्‍या अशा सासूरवासीणींची गर्दी बसस्थानकावर दिसू लागली असून सहा-सात महिण्यांनतर पहिल्यांदाच बसस्थानकावर अबालवृध्दांची गर्दी दिसू लागली आहे.

त्यामूळे एस.टी. ची चाके पुन्हा फिरण्यास हातभार लागणार असून आज (दि.15) पहिल्यांदाच बसस्थानकावर लागलेल्या ग्रामीण भागात जाणार्‍या बसेसमध्ये प्रवासी बसल्याचे दिलासादायक चित्र बघायला मिळाले.

एस.टी.च्या सेवकांंच्या चेहर्‍यावर त्यामूळे हासू फूलले असून ग्रामीण भागातील अर्थचक्रालाही त्यामूळे गती मिळणार असल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या