Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी गर्दी

जिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी गर्दी

नाशिक |Nashik

नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) कोव्हीशिल्ड लसीकरणासाठी गर्दी (Crowd For Covishiled Vaccine) होत आहे. रुग्णालयातील उपहारगृहालगत असलेल्या कक्षात हे लसीकरण सुरू (Vaccination Started) करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोना काळात खास करून फ्रंट लाईन वर्कर (Front Line worker) म्हणून काम केलेल्या आरोग्य (Health), महसूल (Revenue) आणि पोलीस प्रशासनातील (Police Department) कोव्हीड योद्ध्यांचे लसीकरण (Vaccination of covid warriors) करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी आता नागरिक गर्दी करत आहेत.

पूर्वनोंदणी (Pre Registration) करून झाल्यानंतर लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येत असले तरी पूर्वनोंदणीशिवाय लस घेणारे देखील याठिकाणी येत असल्याने गर्दी वाढत असल्याचे वैद्यकीय विभागातील 9Medical Department) सूत्रांनी सांगितले.

शहरातील लसीकरण केंद्रावरील लसींचा साठा (Stock of vaccine) संपुष्टात आल्यानंतर नागरिकांनी आपला मोर्चा जिल्हा रुग्णालयातील केंद्रावर (civil Hospital Center) वळविला आहे. सुरक्षा रक्षक, लसीकरणासाठी असलेले अधिकारी, कर्मचारी जरी शिस्तीने उपस्थित राहण्याचे आवाहन करत असले तरी नागरिक गर्दी करत आहे. प्रसंगी हमरीतुमरीवर देखील येत आहेत.

नागरिकांनी गर्दी न करता, पूर्व नोंदणी करूनच लस घेण्यासाठी यावे; असे आवाहन आरोग्य विभागातर्फे वारंवार करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या