Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात 'इतक्या' दिवसांसाठी जमावबंदी; पोलीस आयुक्तांचा आदेश

नाशकात ‘इतक्या’ दिवसांसाठी जमावबंदी; पोलीस आयुक्तांचा आदेश

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

पोलीस आयुक्तांनी (Commissioner of Police) परिपत्रक (Circular) जारी करत शहरात 31 डिसेंबर रात्री 12 ते 14 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत 15 दिवसांकरिता जमावबंदी (Crowd ban) आदेश लागू केला आहे.

- Advertisement -

शहरात कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित राहण्याकरिता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांनी परिपत्रक जारी करून मनाई आदेश लागू केला आहे. 31 डिसेंबर रात्री वर्ष समाप्ती व नववर्षाचे स्वागत मोठ्या प्रमाणावर केले जाते.

यासोबतच 1 जानेवारीला भीमा- कोरेगाव (Bhima Koregaon) येथे विजयस्तंभ येथे अभिवादन करण्याकरिता येतांना व जातांना त्याचे पडसाद इतरत्र उमटून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या अनुषंगाने तसेच सत्ताधारी व विरोधकांमध्ये सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप चालू आहेत.

महाराष्ट्र (maharashtra) व कर्नाटक (karnataka) सीमावाद यामुळे दावे-प्रतिदावे सुरु असून त्यानुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस आयुक्तांनी मनाई आदेश जारी करत जमावबंदी देखील लागू केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या