Wednesday, April 24, 2024
Homeनगरपीक कर्जासाठी गर्दी; दहा हजारांच्या वाढीने शेतकरी खुश

पीक कर्जासाठी गर्दी; दहा हजारांच्या वाढीने शेतकरी खुश

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांकडून पीक कर्जाचे चेक घेऊन पैसे घेण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून शेतकर्‍यांची मोठी गर्दी होत आहे.

- Advertisement -

31 मार्चला मागील वर्षीचे कर्ज पूर्ण भरल्यावर साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोसायट्या नवीन वर्षाचे कर्ज वाटप करतात. त्यातच चालू वर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळाने शेतकरी हिताचा निर्णय घेत पुर्वीच्या कर्जात भर घालत एकरी दहा हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सोसायटीचे कर्ज विरतणास थोडा विलंब झाला परंतु शेतकर्‍यांना वाढीव रक्कम मिळाली.

गेल्या चार सहा दिवसांपासून पारनेर तालुक्यासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात सोसायट्यांच्या कर्जाचे धनादेश वटवण्यासाठी शेतकरी बंधुंची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्येे मोठी लगबग दिसून येत आहे. शेतकरी एप्रिलमध्ये सोसायटी नवी जुनी करून वाढीव मिळालेली रक्कमेसह देणेदारी देऊन शिल्लक रक्कमेतून आपली गरज भागवतात. चालू वर्षी सोसायट्या उशीरा मिळाल्या असल्या तरी एकरी दहा हजार रुपये वाढून मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या