Friday, April 26, 2024
Homeनाशिकवायू प्रदूषणामुळे पिके धोक्यात

वायू प्रदूषणामुळे पिके धोक्यात

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) लखमापूर औद्योगिक वसाहतीतील (Lakhmapur Industrial Estate) आरसी फर्टिलायझर कंपनीतून (RC Fertilizer Company) निघणार्‍या सूक्ष्म कणांच्या वायू प्रदूषणामुळे (Air pollution) परमोरी शिवारातील द्राक्ष पिकांसह (Grape crop) शेतीपिकाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी (Farmer) त्रस्त झाले आहे. अनेक यंत्रणांकडे दाद मागूनही उपाययोजना होत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

याबाबत शेतकर्‍यांनी पत्रकार परिषद घेत आपली व्यथा मांडली. ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, ज्ञानेश्वर तिडके, शालिराम काळोगे, सदानंद शिवले, वाल्मिक काळोगे, रमेश जाधव, संतोष जमधडे, गोरख बोराडे, विष्णू पाटील, राकेश दिघे, रोशन दिघे, रमेश दिघे, संदीप काळोगे आदी ओझरखेड, परमोरी, वरखेडा ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रदूषणामुळे द्राक्ष पिकासह विविध शेतमालाचे नुकसान होत असल्याने प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना (Pollution prevention measures) कराव्या यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, प्रदूषण नियंत्रंन मंडळ आदींना निवेदने दिली.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Jirwal), पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Environment and Tourism Minister Aditya Thackeray), पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे (Minister of State for Environment Sanjay Bansode) यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. गेल्या पंधरा वर्षांपासून शेतकरी प्रदूषणामुळे त्रस्त आहे. कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

कंपनीचे वायू प्रदूषणाने नुकसान होत असल्याचा प्रार्थमिक अहवाल देत प्रदूषण नियंत्रण मंडळास (Pollution Control Board) पाहणीस बोलवून पिकांवर दुष्परिणाम करणार्‍या विषारी वायुवर निर्बंध (Restrictions on toxic air) आणण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी पाहणी करत पंचनामे करत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्याप कोणतीही उपाययोजना केली नसल्याचा आरोप शेतकर्‍यांनी करत त्वरित प्रदूषण रोखावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या