Friday, April 26, 2024
Homeनाशिकनिफाड तालुक्यात अतिवृष्टी; पिकांचे नुकसान

निफाड तालुक्यात अतिवृष्टी; पिकांचे नुकसान

निफाड |प्रतिनिधी |Niphad

तालुक्यातील पूर्व भागामध्ये (Eastern Part) रुई डोंगरगाव, धानोरे, गाजरवाडी, सारोळा, थडी, खेडले झुंगे, धारणगाव वीर, धारणगाव खडक, देवगाव महादेवनगर या गावांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी (Precipitation) होऊन सोसाट्याच्या वाऱ्यामुळे (Wind) झाडे कोलमडून पडली आहेत.

- Advertisement -

तसेच शेतामधील (Farm) उभी पीके आडवी पडली असून कंनसामध्ये दाणे भरण्याच्या आतच पिकांचे नुकसान झाल्याने महसूल व कृषी (Revenue and Agriculture Department) विभागाने त्वरित पंचनामे (Panchnama) करून शेतकऱ्यांना नुकसान (Damage)भरपाई आणि विमा नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी मांगणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रब्बी पिकाच्या (Rabi Crop) हंगामाकरिता शेतकऱ्यांनी उन्हाळा व लाल कांदा (Onion) रोपवाटिका तयार केलेल्या होत्या. परंतु सततच्या होणाऱ्या पावसाने (Rain) शेजारच्या रोपवाटिकांमधील कांदा रोपे सडून गेल्यामुळे पुन्हा नव्याने कांदा बियाणे शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे.

त्यामुळे नवीन कांदा रोपे तयार करण्याकरिता पावसाने उघडीप दिली नाही तर नवीन रोपे तयार होणार नाही. तसेच सध्या शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये साठवलेल्या कांद्यास बाजारभाव नसल्याने शेतकरी (Farmer) चिंताग्रस्त झाला आहे.

दरम्यान, कांद्याच्या उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे शेतातील झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे, अशी मागणी लासलगाव (Lasalgaon) खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन राजाराम मेमाने, भाजपचे प्रदेश संघटक संपत नागरे, भटक्या विमुक्त जातीचे प्रदेश संघटक संजय चांदे, रुई सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब गायकवाड यांच्यासह आदींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या