Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्हा बँकेतर्फे 'या' महिन्यापासून पीक कर्जवाटप

जिल्हा बँकेतर्फे ‘या’ महिन्यापासून पीक कर्जवाटप

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Central Cooperative Bank) नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या सभासदास एप्रिलमध्ये त्वरित नवीन पीककर्ज (Crop loan) देण्यात येणार आहे.

- Advertisement -

याचा लाभ सभासदांनी घ्यावा, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा बँकेला शासनाने गत हंगाम सन २०२२-२३ खरीप पीककर्ज (Crop loan) वितरणासाठी ५१५ कोटी लक्षांक दिलेला होते. बँकेने पीककर्जासाठी दिलेला लक्षांक पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला असून बँकेने ५२ हजार सभासदांना ४६४ कोटीचे पीककर्ज वाटप केलेले आहे. लक्षांकाच्या ८० टक्के पिक कर्ज वाटप केलेले आहे.

शासन निर्णयानुसार “डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेनुसार” नियमित पीककर्ज घेऊन त्याची परतफेड मुदतीत करणाऱ्या शेतकऱ्याना (farmers) तीन लाख कर्जमर्यादेपर्यंत अल्पमुदत पीककर्ज हे सहा टक्के व्याजदराने देण्यात येते. शेतकरी सभासदानी सन २०२२-२३ हंगामात घेतलेल्या पीककर्जाचा दि.३१ मार्च २०२३ पूर्वी कर्ज भरणा करावा.

नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या सभासदास एप्रिलमध्ये त्वरीत नवीन पीककर्ज देण्यात येणार आहे. सन २०२३-२४ हंगामात पिक कर्ज उचल करण्यास पात्र होऊन शासनाच्या तीन लाखापावेतोचे पिक कर्जास सहा टक्के व्याजाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत जुने कर्ज भरणा करून नवीन सवलतीचे सहा टक्के व्याजदराने पिक कर्ज उचल करावे व शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा.

आज सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरु

कर्जदार सभासदांसाठी संबधीत विविध कार्यकारी संस्थेत,शाखेत हिशोब मिळण्याची सुविधा केलेली आहे.शनिवारी दि.२५ मार्च व ३० मार्च या सुट्टीच्या दिवशीही बँकेच्या शाखेत कर्जवसुलीचे कामकाज सुरु रराहणार आहे. तरी सर्व सभासदानी दि. ३१ मार्चयाखेर पिक कर्जाचा भरणा करून सन २०२३-२४ हंगामासाठी पात्र व्हावे, असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या