Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदहशत पसरवणारे टोळके गजाआड

दहशत पसरवणारे टोळके गजाआड

नाशिक |प्रतिनिधी Nashik

सहा ते सात जणांच्या टोळक्याने एका घरात घुसून हत्यारांनी घरात तोडफोड करून कुटुंबियांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच दहशत पसरवल्याचा प्रकार पंचवटीतील पेठरोड परिसरात सोमवारी सकाळी घडला होता. माहिती मिळताच या टोळक्यास गुन्हे शाखा युनीट दोनच्या पथकाने शिताफिने जेरबंद केले आहे.

- Advertisement -

प्रशांत अशोक जाधव (२७, श्रीधर कॉनी, म्हसरूळ), योगेश प्रल्हाद लांबडे (२४, जकात नाका, म्हसरूळ), रोहन प्रभाकर निकम (२८, टाकळीरोड, जयभवानीनगर), अंकुश भुषण सोनवणे (२५, बोधलेनगर), मयुर विवेकांनद वाघमारे (२३, दत्तमंदिर कॉलनी, उपनगर), जतीन दिलीप साळुंके (१८, पंचवटी) अशी संशयितांची नावे आहेत.

लॉक डाऊन शिथिलतेनंतर अनेक गुंड टोळ्या सक्रिय झाल्या असून आपले वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी दहशत पसरवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहेत. पेठरोड येथील प्रकरणी सोनी जाधव (रा. पेठरोड, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सर्व संशयित पिडीतेच्या भावाच्या ओळखीचे असून काही वादातून या सर्वांनी त्यांच्या घरात बळजबरी प्रवेश करून पिस्तुल, कोयते, चाकू अशी हत्यारे उगारून जाधव कुटुंबियांना शिवीगाळ करत मारहाण केली.

तसेच कोयत्याने घरातील सामानाची तोडफोड करत कोयता दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हे सर्व सराईत असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकार्‍यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणार्‍या पथकातील पोलिस नाईक विशाल काठे व हवालदार विशाल देवरे यांना या आरोपींची माहिती मिळाली.

सदर संशयित म्हसरूळ आडगाव लिंकरोडवरील म्हाडा इमारतीच्याजवळ मोकळ्या पंटागणांत थांबल्याची माहिती त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली. यावेळी आरोपींनी मोटारसायकलवर बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी त्यांना पकडले. अंगझडतीत अशोक जाधव व अंकुश सोनवणे यांच्या ताब्यातून दोन कोयते मिळून आले. आरोपींच्या चार दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या