Friday, April 26, 2024
Homeनाशिकदेवळाली मतदारसंघातील शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे

देवळाली मतदारसंघातील शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील 18 शेतकर्‍यांवरील फौजदारी स्वरूपाचे गुन्हे सरकारने काल मागे घेतल्याची माहिती आ. सरोज अहिरे यांनी दिली.

- Advertisement -

सन 2017 मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनात देवळाली विधानसभा मतदारसंघातील लाखलगाव येथील 18 शेतकर्‍यांवर फौजदारी गुन्हे आडगाव पोलीस ठाण्यात कलम 353 अन्वये दाखल करण्यात आले होते. याबाबत खा. हेमंत गोडसे व आ. सरोज अहिरे यांनी जानेवारी 2020 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन हे गुन्हे मागे घेण्याबाबद विनंती केली होती.

तसेच वेळोवेळी गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. याबाबत आ. आहिरे यांनी सरकारला निवेदन सादर करतांना सांगितले की, शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी केलेल्या आंदोलनाचे गुन्हे सर्वसामान्य, होतकरु, कष्टकरी यांच्यावर दाखल असून ते मागे घेण्यात यावे.

या पाठपुराव्यास यश आले असून राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकरी आंदोलनातील गुन्हे मागे घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याने मतदार संघातील लाखलगाव येथील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या