Friday, April 26, 2024
HomeUncategorizedपुरणपोळी न केल्याने सुनेच्या डोक्यात घातली कडची!

पुरणपोळी न केल्याने सुनेच्या डोक्यात घातली कडची!

औरंगाबाद – aurangabad

जावई सासुरवाडीला आल्यावर त्याचा वेगळाच थाट असतो. मात्र आपल्या सुनेने जावयाचा योग्य पाहुणचार न केल्याने सासू नाराज झाली. त्यानंतर तिने सुनेच्या डोक्यात कडची मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील (Khultabad) खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी गावात ही घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या नणंदेचा नवरा सासुरवाडीला आला होता.

- Advertisement -

आठ वारसास्थळांवर साजरा होणार जागतिक योग दिवस

मुलीचा नवरा सासरी आला असताना त्याच्यासाठी पुरणपोळी का बनवून दिली नाही, असे म्हणत सासूने आपल्या सुनेला बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर किचनमधील कडची तिच्या डोक्यात घातली. यामध्ये सून जखमी झाली आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बाजारसावंगी गावात राहणाऱ्या सुमनबाई भिवा गायकवाड यांच्या घरी त्यांचा जावई आला होता. जावई घरी आला म्हणून काहीतरी गोडधोड बनवावं म्हणून सुमनबाई यांनी आपली सून मनीषा मिठू गायकवाडला पुरणपोळी करायला सांगितली. पण घरामध्ये सामान नाही मग पुरणपोळी कशी करू असे सून म्हणाली. त्यामुळे संतापलेल्या सुमनबाई यांनी सुनेला बेदम मारहाण केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या