Friday, April 26, 2024
Homeनगरचारित्र्याचा संशय घेवून पत्नीचे डोके फोडले

चारित्र्याचा संशय घेवून पत्नीचे डोके फोडले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोड, वॉर्ड नंण 1 मध्ये नवीन घरकुलात राहणार्‍या एका जणाने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून तिच्या डोक्यात ब्लॉक मारुन पत्नीचे डोके फोडून जखमी केले.

- Advertisement -

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गोंधवणी रोड, वॉर्ड नं. 1 मध्ये नवीन घरकुलात राहणार्‍या सविता काशिनाथ सपकाळ ही दुपारच्या घरी आपल्या घरातच असताना त्यावेळी तिचा पती काशिनाथ पंडीत सपकाळ याने पत्नी सवितावर चारित्र्याचा संशय घेवून तिला लाथा बुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ केल तसीेच तिच्या डोक्यात ब्लॉक मारुन तिचे डोके फोडले व तिला जखमी केले.

याप्रकरणी सविता काशिनाथ सपकाळ हिने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनू गुन्हा रजिस्टर नं. 46/2021 प्रमाणे काशिनाथ पंडीत सपकाळ याचेविरुध्द भादंवि कलम 324, 323, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक श्री. ढोकणे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या