Thursday, April 25, 2024
Homeनगरजीवे ठार मारण्यासाठी आलेल्या 7 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

जीवे ठार मारण्यासाठी आलेल्या 7 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

नेवासा |तालुका वार्ताहर|Newasa

नेवासा येथील प्रेमविवाह केलेल्या तरुणास मुलीच्या माहेरच्या मंडळींनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रांसह

- Advertisement -

येऊन तसा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील अटक केलेल्या 7 आरोपींना काल नेवासा न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, नेवासा खुर्द येथील प्रशांत ऊर्फ बंटी राजेंद्र वाघ या तरुणाने 1 मार्च 2021 रोजी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहास मुलीच्या घरच्या मंडळींचा विरोध होता. विवाह केलेल्या तरुणास जीवे ठार मारण्याच्या हेतूने तीन वाहनांतून 9 जण नेवाशात आले होते.

यातील प्रदीप गायकवाड, बळीराम अर्जुन मिरगे, अमोल भीमराज कनोजे, शाहीद सय्यद, नारायण हरिभाऊ चव्हाण, तात्यासाहेब जगदाळे, सतीश भोसले या 7 आरोपींना पोलिसांनी शनिवारीच अटक केली होती. हे सर्व आरोपी खरवंडी कासार (ता. पाथर्डी) तसेच बीड जिल्ह्यातील आहेत.

त्यांना काल रविवारी न्यायालयात हजर केले असता 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या