Thursday, April 25, 2024
Homeनगरचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला वारंवार शिवीगाळ करणार्‍या पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला.

- Advertisement -

ही घटना दि. 23 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी येथे तनपुरेवाडीत घडली. याप्रकरणी पती सोमनाथ इंगवले याला राहुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान, याप्रकरणी मयत अनिता सोमनाथ इंगवले (वय 26) हिचे वडील योसेफ शहादू काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सोमनाथ लक्ष्मण इंगवले याच्याविरूद्ध गुरनं. व कलम – 1399/2020 नुसार भादंवि. कलम 302, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिता ही विवाहित तरूणी आपले पती व दोन लहान मुलांसह राहुरी शहरातील तनपुरेवाडी येथे राहते. काही वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसातच अनिता इंगवले हिचा पती सोमनाथ इंगवले हा अनिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण करीत होता. त्याच कारणावरून त्यांच्यात नेहमी भांडणे होत असे, अशी माहिती मयत अनिताच्या नातेवाईकांनी दिली.

दि. 23 सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजे दरम्यान आरोपी सोमनाथ याने त्याची पत्नी अनिता हिचा गळा दाबून खून केला.

घटनेची माहिती मिळताच सर्व नातेवाईकांनी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी मयत अनिता हिच्या गळ्याच्या मध्यभागी काळसर व लालसर निशाण दिसून आले. तिचे शवविच्छेदन केल्यानंतर तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला आहे. अशी माहिती तेथील वैद्यकीय अधिकारी सायगावकर यांनी दिली.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या