Friday, April 26, 2024
Homeनगरकुकडी नदीपात्रात धान्याच्या कोठीत आढळला मृतदेह

कुकडी नदीपात्रात धान्याच्या कोठीत आढळला मृतदेह

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुकडी नदीच्या कुंडामध्ये अंदाजे वय 35 ते 40 वर्षे पुरुष जातीचा मृतदेह सापडला आहे.

- Advertisement -

लोखंडी डब्यात हा मृतदेह आढळून आला असल्याने घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबतची माहिती पारनेर पोलीस स्टेशनला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन पाहणी केली.

निघोज येथील कुकडी नदीच्या कुंडात एका पेटीमध्ये हा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली, तर हा मृतदेह पुरुष जातीचा असल्याची माहिती समोर आली.

तसेच मयत पुरुषाचे 35 ते 40 वर्षे वय असण्याची शक्यता आहे. कुकडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये हा मृतदेह वाहून आला की संबंधित पुलावर ही मृतदेहाची पेटी फेकण्यात आली. या विषयी तपास सुरू आहे. या व्यक्तीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत पोलिसांची शोधाशोध सुरू आहे.

मृतदेहाचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच पोलीस तपासाची दिशा ठरवली जाणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळी यांनी दिली. मृतदेह लोखंडी पेटीमध्ये असल्यामुळे काहीतरी घातपात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गुरूवारी सात ते नऊच्या दरम्यान पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, हाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे आदींनी याठिकाणी भेट देउन माहिती घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या