Friday, April 26, 2024
Homeनगरअल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अफसर लतीफ सय्यद (वय 26 रा. भराड गल्ली, नगर) याला जिल्हा व

- Advertisement -

सत्र न्यायाधीश एस.एल.आणेकर यांनी दोषी धरून 20 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. तर या गुन्ह्यातील दुसरी महिला आरोपी मुन्नी ऊर्फ शमीना लतीफ सय्यद हिला एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

शहरातील एक अल्पवयीन मुलगी सप्टेंबर 2018 मध्ये सायकल खेळत असताना अफसर सय्यद याने तिला उचलून घराच्या छतावर घेऊन गेला. पीडित मुलीसोबत सय्यद याने गैरवर्तन करीत तिचा विनयभंग केला. यावेळी पीडितेने केलेला आरडाओरडा ऐकून मुन्नी ऊर्फ शमीना सय्यद त्याठिकाणी आली.

झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगू नको नाही तर मिच तुझ्या घरी येऊन तुझ्या आईला तुझे नाव सांगेल. अशी धमकी शमीना हिने पीडित मुलीला दिली होती. दुसर्‍या दिवशी पीडित मुलगी सायकल खेळत असताना अफसर याने पुन्हा तिला उचलून घराच्या छतावर नेले. पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अफसर याने तिच्यावर अत्याचार केला.

या घटनेनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात भादंवि 376, 354, पोक्सो आदी कलमान्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस उपनिरीक्षक व्ही. एल. सणस यांनी करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी पक्षाच्यावतीने सहा साक्षीदार तपासले गेले. सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार लक्ष्मण काशिद व बी. बी. बांदल यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या