Friday, April 26, 2024
Homeजळगावप्रतिभा शिंदे यांच्यासह 200 आंदोलकांंविरोधात गुन्हा दाखल

प्रतिभा शिंदे यांच्यासह 200 आंदोलकांंविरोधात गुन्हा दाखल

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कृषी विधेयक रद्द करणे, यासह इतर मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले होते.

- Advertisement -

या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रतिभा शिंदे यांच्यासह 200 आंदोलकांंविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करावे,यासह विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधव दि.5 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेदमुद धरणे आंदोलनाला बसले होते.

या आंदोलनाला आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांनी शुक्रवारी भेट देवून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनांमध्ये 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेपासून ते 6 नोव्हेंबर दुपारी 1 वाजेपर्यंत आकाशवाणी ते स्वातंत्र्य चौकापर्यंत सार्वजिनक रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडविला.

तसेच कोरोना पार्श्वभूमीवर जमाव बंदीचे आदेश असतांनाही अनावश्यक गर्दी जमवून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केले.

त्यामुळे प्रतिभा शिंदे, भरत कार्डिले, सचिन धांडे, तारांचद बारेला, केशव वाघ, अतुल गायकवाड यांच्यासह 150 ते 200 आंदोलकांंविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भाग 5 गुरनं 129/2020 भादंवि कलम 341, 143, 188 साथरोग प्रतिबंध कायदा कलम 2, 3 व 4 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) चे उल्लंघन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या