Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारअश्लिल मेसेज प्रसारीत करण्याची धमकी देत 30 हजाराची खंडणी उकळणार्‍या महिले...

अश्लिल मेसेज प्रसारीत करण्याची धमकी देत 30 हजाराची खंडणी उकळणार्‍या महिले विरूध्द गुन्हा

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील बोराळे येथील एका पुरुषाला (man) अश्लिल मेसेज (Pornographic messages) पाठवून ते प्रसारीत करण्याची धमकी देत (Threatening) 19 वर्षीय महिलेने 30 हजार रूपयांची खंडणी उकळण्याची (boil the ransom) घटना घडली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात एका महिले विरूध्द (Crimes against women) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार तालुक्यातील बोराळे येथील 38 वर्षीय पुरूषाचा मोबाईलवर 19 वर्षीय महिलेने एप्रिल 2021 मध्ये मेसेज पाठविला. त्यानंतर दोघांमध्ये व्हॅाटस्अपवर चेटींग (Chatting on WhatsApp) झाली. त्यानंतर सदर महिलेने तुझा अश्लिल फोटो पाठव असे सांगितले. त्यानंतर सदर पुरूषाने आधी तुझा फोटो पाठव असे सांगितले. त्यानंतर सदर महिलेने त्या पुरूषाला फोन करत तुम्ही मला अश्लिल मेसेज का पाठवता. असे सांगत मी तुझी गावात बदनामी करत पोलीसात गुन्हा दाखल करेल असे सांगत 50 हजार रूपयांची मागणी केली.

त्यानंतर सदर पुरूषाने बोराळे गावाच्या बाहेर नाशिंदे रस्त्यावर 30 हजार रूपये दिले. 30 हजाराची खंडणी उकळणार्‍या महिले विरूध्द फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 384 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या