Friday, April 26, 2024
Homeनगरश्रेय वादावरूनच प्रति सभेत विरोधकांमध्ये जुंपली

श्रेय वादावरूनच प्रति सभेत विरोधकांमध्ये जुंपली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हॉटेलच्या (Hotel) बंदीस्त हॉलमध्ये केवळ संचालकांच्या उपस्थितीत शिक्षक बँकेच्या (Teacher Bank) सत्ताधार्‍यांनी ऑनलाईन सभा (Online Meeting) घेत विरोधकांना लांब ठेवले. यावेळी सत्ताधार्‍यांनी केलेल्या आखणीमुळे शेवटपर्यंत विरोधकांना (Opponent) संचालकांपर्यंत पोहचला आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी ऑनलाईन सुरू असणार्‍या सभेच्या (Online Meeting) हॉटेलमधील हॉलच्या बाहेर प्रति सभा घेतली. मात्र, या सभेत विरोधकांमध्ये श्रेया वाद रंगाला. यामुळे त्यांच्यात जुगलबंदी रंगली. यामुळे सत्ताधार्‍यांनी बँकेच्या (Bank) सर्व विरोधकांना एका प्रकारे कात्रजचा घाट (Katraj Ghat) दाखल्याचे चित्र होते.

- Advertisement -

प्राथमिक शिक्षक बँकेची (Primary Teachers Bank) 102 वी वार्षिक सर्वसाधाण सभा (102 nd Annual General Meeting) रविवारी ऑनलाईन पध्दतीने (Online) नगरमध्ये पारपडली. या सभेत झुम आणि यु टूबवर ऑनलाईन पध्दतीने सभासदांनी प्रश्न विचारत चर्चा केली. मागील सभेत विरोधकांनी ऑनलाईन सभेत कॅमेर्‍याचा ताबा घेत सत्ताधार्‍यांना कामकाजाबाबत जाब विचारला होता. यातूून बराच गोंधळ (Confusion) झाला होता. तो टाळण्यासाठी यंदा सत्ताधारी संचालकांनी एका हॉटेलच्या (Hotel) हॉलमध्ये सत्ताधारी 20 संचालक आणि बँकेचे (Bank) निवडक कर्मचारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन सभा (Online Meeting) घेतली. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे विरोधकांना संचालकांपर्यंत पोहचता आले नाही.

दरम्यान, रविवारी सकाळी ऑनलाईन होणार्‍या सर्वसाधारण सभेच्या ( General meeting) ठिकाणी विरोधक (Opponent) पोहचले. मात्र, त्यांना पोलीसांनी सभेच्या कामकाजात प्रत्यक्षात ऐवजी ऑनलाईन सहभागी व्हावे, असे स्पष्ट केले. त्यानंतर विरोधकांनी हॉटेलच्या आवारात सत्ताधार्‍यांचा तीव्र शब्दात निषेध (Protested) केला. तसेच संचालक मंडळाने केलेल्या गैरकारभार, घड्याळ घोटाळा (Clock Scam), प्रवास भत्ता घोटाळा (Travel allowance Scam), अन्य खर्चात गैरप्रकार केल्याचा आरोप (Allegations of misappropriation in other expenses) केला. यावेळी रोहकले गटाचे प्रवीण ठुबे, विकास डावखर, संजय शिंदे, संतोष निमसे, गुरूकुलचे नेते संजय कळमकर, रा.या. औटी, संजय धामणे, विजय महामुनी, सदिच्छा मंडळाचे नेते राजू शिंदे, नारायण राऊत, नवनाथ तोडमल, बाबा आव्हाड, शैलेश खनकर, रेहमान शेख, बाळासाहेब मोरे, ऐक्य मंडळाचे सुनील शिंदे, बाळासाहेब कदम, राजेंद्र निमसे, बहुजन मंडळाचे सुभाष बगनर, इब्टाचे नवनाथ अडसूळ आदी उपस्थित होते.

त्यानंतर या सर्वांनी हॉटेलच्या (Hotel) तिसर्‍या मजल्यावर धाव घेत ऑनलाईन सभेच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी पोहचता येत नसल्याने अखेर तेथेच प्रतिसभा सुरू केली. सभेच्या अध्यक्षस्थानी औटी (Auti) यांची निवड करण्यात आली. यामुळे हॉटेलच्या हॉलमध्ये ऑनलाईन सभा तर बाहेर प्रती सभा सुरू होती. यावेळी डावखर यांनी सत्ताधार्‍यांवर आरोप केले. तसेच ही सभा सहकार कायद्याला धरून नाही. पंचतारांकीत हॉटेलमध्ये (Hotel) सभा कशी घेतली. सुरक्षा रक्षक घोटाळा यावरून आरोप केले. या प्रति सभेचे रोहकले गटाकडून फेसबुकवर प्रक्षेपण सुरू होते. यावरून वादाला सुरूवात झाली. या ठिकाणी बँकेच्या चार स्वतंत्र विरोधकांचे गट होते. प्रत्येकाचे स्वतंत्र प्रक्षेपण करणार की ज्याने त्याने आपल्या गटाचे प्रक्षेपण करावयाचे यावरून सदिच्छाचे शिंदे, राऊत आणि रोहकले गटाचे डावखरे आणि ठुबे यांच्यात चकमक झाली.

अखेर अन्य विरोधकांना आपल्यात वाद नकोत, म्हणून हस्तक्षेप करावा लागला. मात्र, या प्रकारावरून विरोधकांत दुही पडल्याचे दिसले. पुढे गुरूकुलचे धामणे यांनी सत्ताधारी संचालकांमध्ये रोहकले गटाचे सात संचालक आहेत. बँकेच्या गैरप्रकारात (Malpractice of the Bank) ते ही सहभागी आहेत का?, याबाबत विचारणा करताच पुन्हा रोहकले गटाचे (Rohkale Group) डावखरे संतप्त (Davkhare Angry) झाले. तसेच आमच्या सात संचालकांच्या विषय काढून आमचा अपमान करून नका, अशी तंबी दिली. त्यावर धामणे यांनी पुन्हा तुमचे संचालक ऑनलाईन सभेसाठी हॉटेलमध्ये आलेच कसे, असे म्हणत, तुम्हाला राग येण्याचे काहीही कारण नाही, असे स्पष्ट केले. यावेळी ठुबे, रघुनाथ झावरे, नवनाथ अडसूळ, औटी (Auti) यांनी सत्ताधार्‍यांवर सडकून टीका केली. दीडच्या सुमारास प्रती सभा आटोपली. यावेळी धामणे यांनी जास्ती सभासदांनी विषय नामंजुरीचे मेल बँकेला (Bank) पाठविण्याचे आवाहन (Appeal) केले.

सभासदांच्या हाती ‘केळी’

प्रतिसभेत संतप्त झालेल्या एका विरोध गटाच्या नेत्याने संचालकांच्या हाती लाडून अन् सभासदांच्या हाती केळी अशी संतप्त प्रतिक्रया दिली. तसेच संचालक मंंडळ हे तालिबानी प्रवृत्तीचे असून सभासदांसाठी प्राण गेला तरी चालेल पण आता माघार नाही, या शब्दात संताप व्यक्त केला, तसेच शेवटपर्यंत पोलीसांना विनवणी करत हॉलमध्ये सोडण्याची विनंती केली.

सभासदांना पाच मिनिट अन् चेअरमनला दोन तास

ऑनलाईन सभेत चेअरमन सलीमखान पठाण यांनी दोन तास मार्गदर्शन केले आणि सभासदांना पाच मिनिट वेळ हे बरोबर नाही. तसेच मृत पावलेल्या सभासदांना बँके 55 लाखांपर्यंत मदत देते, पण तो आयसुयूत असतांना उपचारासाठी मदत द्या, संबंधीत शिक्षक सभासद बरा झाल्यावर त्याच्याकडून देण्यात आलेली ती रक्कम कर्ज रुपाने ते फेडून घ्यावी, माणूस गेल्यावर मदत देण्याऐवजी जिवंत असतांना मदत आवश्यक आहे. तसेच मयत सभासद मदत योजनेसाठी 500 रुपये किती दिवसांसाठी कपात करणार याचा खुलासा करण्याची मागणी डॉ. संजय कळमकर यांनी यावेळी केली.

पोलीस वाहन बोलविताच तो गायब

ऑनलाईन सभा सुरू असणार्‍या हॉलमध्ये पत्रकारांच्या पाठोपाठ एक बहुजन मंडळाचा नेता शिरला आणि सभेत मला बोलण्याची परवागी द्या, तसेच अन्य नेत्यांनाही या ठिकाणी बोलावून बोलण्याची संधी द्या, अशी मागणी केली. त्यावर एकतर गप्प बसा अन्यथा बाहेर जावून ऑनलाईन बोला, असे संचालकांनी त्यांना सुनावले. यावेळी पोलीस त्यांना बाहेर जाण्यास सांगत होते. मात्र, ते ऐकत नव्हते. अखेर त्याच्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यातून वाहन मागविण्यासाठी फोन करताच ते शिक्षक सभासद विन्रम त्या ठिकाणाहून गायब झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या