घोटविहीरा पाठोपाठ पिंपळपाड्यातही जमिनीला पडल्या भेगा; पेठ तालुक्यातील दुसरी घटना

jalgaon-digital
1 Min Read

पेठ | Peth

गत सप्ताहात घोटविहीरा परिसरातील गावानजीकच्या डोंगरउतारावर जमीनीस भेगा (Cracks) पडल्याचे निदर्शनास आले होते. यापाठोपाठ आता पिंपळपाडा (Pimpalpada) येथेही जमीनीस भेगा पडल्या आहेत…

यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. पिंपळपाडा (Pimpalpada) परिसरात उत्तर दिशेस जवळपास २०० मिटर लांब व ५ ते ६ इंच रुंदीच्या भेगा पडल्याचे दिसून आले आहे.

डोंगरउतारावर पडल्या मोठमोठ्या भेगा; पेठ तालुक्यातील ‘एक’ गाव केले रिकामे

भेगा पडलेत्या जागेवर दोन कुटुंबे वास्तव्यास असल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले तर थोड्याच अंतरावर पोल्ट्री (Poultry) शेड असल्याने त्यांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती तहसीलदार संदीप भोसले (Sandip Bhosale) यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *