नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महसूल अधिकाऱ्यांना (Revenue Officers) आंदोलन (Agitation) करण्याची परवानगी पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) नाकारली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी महसूल विभागाबाबत केलेल्या वक्तव्य मागे घेतले नसून येत्या काळात हा संघर्ष अजून पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही….
दरम्यान, पोलीस आयुक्त पांडेय यांच्या पत्रातील महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे महसूल कर्मचारी संघटना आक्रमक झाली होती. महसूल संघटनेने दिलेला अल्टीमेटमची मुदत संपली आहे.
त्यांनी कोणतीही लेखी माफी मागितली नसून त्यांनी केलेल्या वक्तव्यावर ते ठाम आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे परवानगी मागितली होती. ती परवानगी आता त्यांनी नाकारली असून आयुक्तांनी काढलेल्या आदेशात महसूल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलेले आहे.