पावसाचा कहर! वीज कोसळून गाय आणि बैल मृत्युमुखी

वीरगाव (वार्ताहर)

मंगळवारी रात्री 11.00 च्या सुमारास मेघगर्जनेसह सुरु झालेल्या पावसात वीज कोसळून बैल आणि गाय मृत्युमूखी पडली. अकोले तालुक्यातील देवठाणच्या काठवटवाडीत ही घटना घडल्याने शेतक-याचे एक लाखापेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले आहे.

देवठाणचे लक्ष्मण नामदेव पथवे यांचे मालकीचे बैल आणि गायीवर ही वीज कोसळल्याने दोन्ही जनावरे जागेवर मृत झाली. त्यांचे वस्तीवर ही दोन्ही जनावरे घराबाहेर बांधलेली असताना रात्रीच्या वेळी सर्वजण झोपेत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. तीन महिन्यांपुर्वी या शेतक-याची बैलजोडी नांगरासकट विहीरीत पडली होती. त्यावेळी एक बैल मृत झाला होता. आता वाचलेल्या बैलावरही वीज कोसळल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

घटनास्थळी देवठाणचे सरपंच केशव बोडके, माजी पं.स.सदस्य अरुण शेळके आणि ग्रामस्थांनी भेट दिली. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर धिंदळे, डॉक्टर कुसळकर आणि कामगार तलाठी बाळकृष्ण सावळे यांनी घटनेचा पंचनामा केला. शेतक-यावर कोसळलेल्या संकटामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *