Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशVideo : शाळकरी मुलीवर गायीचा हल्ला, शिंगाने उचलून चिरडलं... घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये...

Video : शाळकरी मुलीवर गायीचा हल्ला, शिंगाने उचलून चिरडलं… घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

चेन्नई | Chennai

रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांनी हल्ले केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. पण, चेन्नईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या नऊ वर्षीय मुलीवर गायीने जीवघेणा हल्ला केला. ही घटना कॉलनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

- Advertisement -

या सीसीटीव्ही व्हिडिओत एक महिला आपल्या दोन मुलांबरोबर शाळेतून घरी परतताना दिसत आहे. तिच्याबरोबर एक पाच-सहा वर्षांचा मुलगा आहे तर एक नऊ-दहा वर्षांची मुलगी आहेत. एका अरुंद रस्त्याने आई आणि दोन मुलं पायी चालताना दिसत आहेत. त्यांच्या समोर एक गाय आणि एक वासरू जात असल्याचंही दिसतंय. मुलगी गायीच्या बाजूने चालत असताना अचानक गाय मागे वळते आणि त्या मुलीला शिंगाने उचलून जमिनीवर आपटते. काही कळायच्या आतच गायीने मुलीवर हल्ला केला. आसपासच्या लोकांनाी आरडाओरडा करत गाईला हाकलण्याचा प्रयत्न केला. पण गाय त्या मुलीवर हल्ला करतच राहिली.

मुलीची आई किंकाळ्या मारतानाही व्हिडिओत ऐकू येतंय. काही लोकं गायीला दगड मारून हकलण्याचा प्रयत्न करताना दिसताय. पण त्यालाही न जुमानता गायीचा मुलीवर हल्ला सुरुच होता. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर लोकांनी मुलीची गायीच्या तावडीतून सुटका केली. मुलीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आलं. सुदैवाने मुलीला गंभीर दुखापत झाली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या