Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकखासगी रुग्णालयांत कोविशिल्ड लस उपलब्ध

खासगी रुग्णालयांत कोविशिल्ड लस उपलब्ध

नाशिक । प्रतिनिधी

शहरात गेल्या गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्ग वाढत असल्याने शासकीय यंत्रण सतर्क झाली असतांना दुसरीकडे करोनाला अटकाव करण्यासाठी दिली जात असलेली कोविशिल्ड लस आता नाशिक शहरातील 12 खासगी रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. यामुळे महापालिका व सरकारी रुग्णालयात कोविशिल्ड डोस घेण्यासाठी झालेली गर्दी विभागली जाणार आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात करोना प्रादुर्भाव वाढत असुन दररोज 200 ते 300 च्या सरासरीने रुग्ण वाढत आहे. या वाढत्या रुग्णांमुळे महापालिका आरोग्ययंत्रणा कामाला लागली असून अनेक रुग्ण हे घरीच उपचार घेणे पसंत करीत आहे. पुढील काहीं दिवसात करोनासंसर्ग वाढत जाण्याची शक्यता आहे. प्रति दिन रुग्णांचा आकडा 700 ते 800 पर्यत जाण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे.

अशाप्रकारे महापालिका प्रशासन सज्ज झाले असतानाच महापालिका वैद्यकीय विभागाकडून शहरातील मनपा व सरकारी रुग्णालयात कोविशिल्ड लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाचे काम सुरू झाले आहे. यानंतर आता शहरातील बारा खासगी रुग्णालयात कोविशिल्ड लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

शासनांकडून मान्यता मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांना डोस उपलब्ध करुन दिले जात आहे. पुढच्या काळात शासनाकडून लसीकरणाची मान्यतेची पूर्तता केल्यास अजूनही खासगी रुग्णालयातून डोस उपलब्ध होणार आहे. यामुळे लसीकरणासाठी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही.

डोससाठी 250 रुपयांच्या वर आकारणी नको

खासगी रुग्णालयांतून प्रति डोस 250 रुपयांच्यावर आकारणी करु नये असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहे. खाजगी रुग्णालयांकडुन शासनाला प्रति डोस 150 रुपये याप्रमाणे पैसे भरल्यानंतर हे डोस उपलब्ध करुन दिले जात आहे. शहरातील 9 खासगी रुग्णालयांना 4 मार्चपर्यत 1480 डोस वितरीत करण्यात आले आहे. मान्यता दिलेल्या खासगी रुग्णालयांना त्यांच्या मागणीनुसार डोस उपलब्ध करुन दिले जात असल्याची माहिती मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या