Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशमोठी बातमी : भारतात दोन कोरोना लसींना मंजुरी

मोठी बातमी : भारतात दोन कोरोना लसींना मंजुरी

नवी दिल्ली

एकीकडे जगभरात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दहशतीचे वातावरण असताना सुखद बातमी आज आली. भारतात कोवॅक्सीन व कोविशील्ड या दोन लसींना मंजुरी मिळाली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

भारतात सीरम व भारत बायोटेक या दोन्ही संस्थांनी तयार केलेल्या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु अजून लसीकरण कधीपासून होणार यांची माहिती देण्यात आली नाही.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सीरमने दिलेल्या अहवालामध्ये ही लस 70 टक्के यशस्वी झाली. आपत्कालीन परिस्थिती या दोन्ही लसींना मंजूर दिली आहे. मात्र क्लिनिकल चाचणी अद्यापही चालू आहे. तर भारत बायोटेकने तयार केलेल्या लशीचे मागच्या दोन महिन्यात कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाहीत अशी माहिती समोर आली आहे.

दोन ते आठ डिग्री सेल्सिअसमध्ये ही लस स्टोअर करावी लागणार असून या लशीचे नागरिकांना सीरम किंवा भारत बायोटेक लशीचे दोन डोस देण्यात येतील. दरम्यान भारतात 2 जानेवारीपासून 116 जिल्ह्यांमध्ये ड्राय रन देखील सुरू झालं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या