Thursday, April 25, 2024
HomeनगरCOVID19 : नगर जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ३ हजारांच्या पुढे; आज 'इतक्या' रुग्णांची...

COVID19 : नगर जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ३ हजारांच्या पुढे; आज ‘इतक्या’ रुग्णांची नोंद

अहमदनगर (प्रतिनिधी)

आठ दिवसांपासून करोना संसर्गाच्या प्रसाराने वेग घेतल्याने नगरकरांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. शनिवारी पुन्हा ५१० अहवाल पाझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

गेल्या ४८ तासांत म्हणजेच दोन दिवसांत जिल्ह्यात १३०५ करोनाबाधित वाढले आहेत. दरम्यान, नागरिकांनी कोविड नियमांचे पालक करून करोनाला रोखावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.

सोनाली कुलकर्णीचा मकरसंक्रातीनिमित्तचा लूक पाहिलात का…

नव्या वर्षाच्या प्रारंभापासूनच करोना प्रसाराने वेग घेतला आहे. पूर्ववत झालेले जनजीवन त्यामुळे भितीच्या छायेत आले. गेल्या आठ दिवसांत तर करोना बाधितांच्या वाढीने अचानक वेग घेतला. गेल्या दोन दिवसांत थेट १३०५ बाधित वाढले.

शनिवारी सकाळी हाती झालेल्या अहवालानुसार २४ तासांत ५१० बाधितांची भर पडली. यात एकट्या नगर शहरातील १८२ जणांचा समावेश आहे. राहाता तालुक्यात ६३ बाधित आढळले. दरम्यान, जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या सक्रीय रूग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

शहर अन् कहर

नगर शहरात करोनाचा कहर होवू द्यायचा नसेल तर नागरिकांनी कोविड नियमांचे कठोरपणे पालक करण्याची गरज आहे. गेल्या दोन दिवसांत नगर शहर व तालुक्यातील रूग्णसंख्येने ५०० चा आकडा ओलांडला आहे. शुक्रवारी नगर मनपा क्षेत्रात २०० तर तालुक्यात १४७ बाधित आढळले होते. तर शनिवारी मनपा क्षेत्रात १८२ आणि तालुक्यात ३१ बाधित आढळले. तर दोन दिवसांत भिंगार छावणी क्षेत्रात २० बाधित आढळून आले आहेत.

मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

- Advertisment -

ताज्या बातम्या