Tuesday, April 23, 2024
Homeनाशिककोविड योद्ध्यांना 10 टक्के वेतनवाढ द्यावी - उपमहापौर

कोविड योद्ध्यांना 10 टक्के वेतनवाढ द्यावी – उपमहापौर

नाशिक । Nashik

कोविड – 19 या महामारी मध्ये 18 – 16 तास काम करणारे डॉक्टर्स, सिस्टर, वार्डबॉय, रुग्णवाहिका चालक, सिक्युरिटी यांना एप्रिल ते जुलै या तीन महिन्याकरिता पगाराच्या 10 टक्के वाढ देऊन त्यांचा सन्मानीत करावी अशी मागणी उपमहापौर श्रीमती भिकुबाई किसनराव बागुल यांनी केली आहे.

- Advertisement -

शहरात गेल्या मार्च महिन्यापासुन सुरु झालेल्या करोना विषाणुच्या साथीचा मोठा प्रादुर्भाव झालेला असतांना महापालिका आयुक्त, सर्व डॉक्टर्स, नर्स, वार्डबॉय व इतर कर्मचारी सातत्याने काम करीत आहे. हे सर्वजण 18 – 16 तास काम करीत असल्याने याची दखल प्रशासनाने घ्यावीत म्हणुन ही मागणी मुंबई महापालिकाच्या धर्तीवर उपमहापौरांनी आयुक्त गमे यांच्याकडे एका प्रस्तावाद्वारे केली आहे.

हा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवण्यात आला आहे. मार्च ते जुलै या काळात ज्यांचा या सेवेशी प्रत्यक्ष संबंध आहे असे सर्व कर्मचारी वर्गाला किमान एप्रिल पासुन तर जुन पर्यत तीन महिने त्यांच्या पगाराच्या 10 टक्के सतकी वाढ मंजुर करुन त्याचा लाभ त्यांना तातडीने द्यावा. यामुळे कर्मचारी व डॉक्टर यांचे मनोबल वाढेल. तसेच आयुक्त यांनी यात उल्लेखनीय असुन शहरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ते प्रयत्न करीत आहे.

सर्व आरोग्य वैद्यकिय कर्मचारी व डॉक्यर्स यांचे 17 दिवसाचे पगार कपात झाले असुन ते ताबडतोब त्यांना इन्सेंटीव्ह सह देण्यात यावेत. मुंबई महापालिकेप्रमाणे डॉक्टर्स, आरोग्य – वैद्यकिय कर्मचारी यांना इन्सेंटीव्ह मंजुर करावा असेही उपमहापौरांनी या प्रस्तावात म्हटले आहे.

मनपा शिक्षकांना विमा कवच द्या

महापालिकेचे साडेसहाशेच्यावर शिक्षक कोविड – 19 च्या सर्व्हेक्षण काम करीत असुन प्रशासनाच्य आदेशानुसार शिक्षक मोठ्या जिद्दीने कम करीत आहे. मात्र त्यांना कोणतेही विमा संरक्षण देण्यात आलेले नाही. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व्हेक्षणाचे काम करणार्‍य शिक्षकांना विमा सरंक्षण द्यावेत अशी मागणी शिक्षण सभापती संगिता गायकवाड यांनी केली आह. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या