Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCOVID Vaccines : Sputnik V लसीच्या १० कोटी डोसचे भारतात होणार उत्पादन

COVID Vaccines : Sputnik V लसीच्या १० कोटी डोसचे भारतात होणार उत्पादन

मुंबई | Mumbai

रशियाच्या गैमेलेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी द्वारे ‘स्पुतनिक व्ही’ (Sputnik V) ही लस तयार केले गेले आहे. व्हॅक्सीनच्या तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीस मान्यता देण्यात आली आहे. या लसीचे उत्पादन आता भारतात होणार आहे. यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (Russian Direct Investment Fund) आणि हैदराबाद येथील हेटेरो बायोफार्मा (Hetero Biopharma) कंपनीसोबत करार झाला आहे.

- Advertisement -

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही कंपन्या एकत्रितपणे दरवर्षी १०० मिलियन (१० कोटी) डोसचे उत्पादन करतील. ही दुसरी लस आहे जिचे भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात डोस तयार करण्यात येणार आहेत.

हेटरो लॅब्ज लिमिटेडचे ​​आंतरराष्ट्रीय विपणन संचालक मुरली कृष्णा रेड्डी म्हणाले की कोविड -19 च्या उपचारात Sputnik V सर्वात प्रभावी आहे. आम्ही लसी विकसित करण्यासाठी RDIF बरोबरच्या या भागीदारीमुळे खूप खूष आहोत. ही भागीदारी आमची कमिटमेंट आणि कोरोनाविरूद्धच्या लढाईतील मेक इन इंडिया मोहिमेच्या पूर्ततेसाठी आणखी एक पाऊल आहे.

चाचणी दरम्यान करोनाशी लढा देण्यासाठी Sputnik V 95% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. क्लिनिकल चाचणीच्या दुसऱ्या प्राथमिक विश्लेषणामध्ये असे दिसून आले की पहिल्या डोसच्या 42 दिवसानंतर त्याने 95% कार्यक्षमता दर्शवली. डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी हा डाटा 91.4% होता. इतर लसींच्या तुलनेत याची किंमतही कमी असेल. रशियाच्या लोकांना हे विनामूल्य मिळेल. इतर देशांमध्ये लसीची किंमत 700 रुपयांपेक्षा कमी असेल.

हैदराबाद बेस्ड कंपनी हेटरो ही भारतातील आघाडीची जेनेरिक फार्मास्युटिकल कंपनी आहे. डॉ. बीपीएस रेड्डी यांनी 1993 मध्ये याची स्थापना केली होती. ही HIV / AIDS उपचारांसाठी अँटी रेट्रोव्हायरल औषधांची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. कंपनीला फार्मास्युटिकल उद्योगात 25 वर्षांचा अनुभव आहे. हेटरोच्या व्यवसाय 126 देशात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या