Friday, April 26, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात कोविड लस संपली !

त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात कोविड लस संपली !

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

येथील उपजिल्हा रुग्णालयात देण्यात येणारी काविड प्रतिबंधात्मक लस संपल्याने आज अनेकांना माघारी जावे लागले.

- Advertisement -

ज्येष्ठ व्यक्तींना देण्यात येणारी तसेच ४५ वर्षाच्या पुढील व्यक्तींना देण्यात येणारी लस येथे देण्यात येत होती. तथापि ४५ वर्षावरील स्री पुरुष प्रौढांची गर्दी वाढल्याने झाल्याने आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास लस संपली. त्यामुळे लस घेण्यासाठी आलेल्या अनेकांना माघारी जावे लागले.

याबाबत त्रंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मंदाकिनी बर्वे यांना विचारले असता लस आजच संपली असून लस उपलब्ध झाली की लगेच लसीकरण सेवा सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. लस मिळावी म्हणून या उपजिल्हा रुग्णालय कडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

त्र्यंबकेश्वरमध्ये करोनाने कहर केला असून १५ दिवसांत १७ व्यक्तींचा बळी गेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या