Wednesday, April 24, 2024
Homeनगरसाडेतीन कोटींचा कोव्हिड सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव सरकारकडे सादर

साडेतीन कोटींचा कोव्हिड सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव सरकारकडे सादर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात मार्च महिन्यांपासून करोना रुग्ण आढळत असून यात जिल्हा परिषदेच्या सात अधिकारी-कर्मचारी यांचा बळी गेलेला आहे.

- Advertisement -

या सर्वांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचा 3 कोटी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाला सादर करण्यात आला आहे. हे अनुदान तातडीने संबंधितांच्या कुटुंंबियांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेला क्षीरसागर यांच्या रुपाने पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लाभले आहेत. क्षीरसागर यांनी पदभार स्वीकराल्यानंतर आधी प्रशासकीय कामांना गती दिली आहे. यात विभागनिहाय सुरू असणार्‍या कोर्ट केसेस, सुनावण्या तातडीने निकाली काढण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात यावेत, यासाठी सर्व विभाग प्रमुखांना आदेश दिले आहेत.

यासह सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना तातडीने पेन्शन सुरू व्हावी, यासाठी क्षीरसागर यांचा प्रयत्न आहे. त्यात करोना बळी ठरलेल्या अधिकारी- कर्मचार्‍यांची माहिती त्यांनी घेतली असून यात प्रभारी कार्यकारी अभियंता किशोर गिते, वरिष्ठ साहय्यक अंबादास ठाणगे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वैराळ, वरिष्ठ साहय्यक शिवशंकर परांडकर, ग्रामसेवक प्रशांत अहिरे, जिल्हा परिषदेतील शिपाई अलका व्यवहारो आणि ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश कोकाटे यांच्या कोविड सानुग्रह अनुदानाचे प्रत्येकी 50 लाख रुपयांप्रमाणे 3 कोटी 50 लाख रुपयांचे प्रस्ताव ग्रामविकास विभागाला सादर करण्यात आले आहेत.

मृतांच्या नातेवाईकांचे नावे अनुकंपाच्या यादीत

करोनाबळी ठरलेल्या कर्मचार्‍यांना कुटूंबियांना तातडीने पेन्शन सुरू करण्यासोबत त्यांची घरातीलकर्त्या व्यक्तींची नावे जिल्हा परिषदेच्या अनुकंपाच्या यादीत समाविष्ट करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी दिले आहेत. यासह सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीपासून पेन्शन मंजूर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या