Friday, April 26, 2024
Homeनगरकोविड खाजगी रुग्णालयात शासकीय दराचे फलक लावा

कोविड खाजगी रुग्णालयात शासकीय दराचे फलक लावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना बाधित रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये शासन निर्णयानुसार उपचाराचे देयक खर्च आकारणी करण्यात यावी, देयक खर्च आकारणीसह मार्गदर्शक सूचना फलक

- Advertisement -

मराठीतून कोविड खाजगी रुग्णालयांमध्ये लावण्याची मागणी फुले ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर, संकेत लोंढे, संदीप शेलार, तेजस दळवी, आशिष भगत, निखिल ताठे, ऋषिकेश ताठे, संतोष उंडे, संकेत ताठे, किरण जावळे, अमोल भगत, योगेश भुजबळ, संदीप दळवी, संतोष हजारे, गणेश जाधव, अजिंक्य पाटील, विश्वास शिंदे, विक्रम बोरुडे, महेश गाडे आदी उपस्थित होते.

नगर शहरासह जिल्ह्यामध्ये करोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असून करोना बाधित रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे खाजगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे.

तथापि खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना उपचारासाठी येणार्या सर्वसाधारण खर्चाची माहिती नुकत्याच निर्गमीत केलेल्या शासन निर्णयानुसार मराठी भाषेमध्ये खाजगी रुग्णालयाच्या दर्शनी भागामध्ये लावण्यासाठी आदेश देण्यात यावे.

जेणेकरून खाजगी कोविड रुग्णालयांकडून रुग्णांची होणारी आर्थिक पिळवणूकीस पायबंद होईल. तसेच खाजगी रुग्णालयातील कोरोना उपचारावरील खर्च देयकाबाबत रुग्णांची तक्रार असल्यास कोणाशी संपर्क साधावा याबाबतची माहिती देखील मराठी भाषेमध्ये प्रदर्शित फलकावर लावण्याची मागणी फुले ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या