Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकरोनाची हद्दपारी झालेल्या मालेगावात आढळले 'इतके' रुग्ण

करोनाची हद्दपारी झालेल्या मालेगावात आढळले ‘इतके’ रुग्ण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

करोनाचा उद्रेक (Covid Outbreak) सुरुवातीला झाला तो मालेगावातच (malegaon) आणि हद्दपारीदेखील झाली ती मालेगावातच. गेल्या अनेक दिवसांपासून एक रुग्णही आढळून येत नसलेल्या मालेगाव महापालिकेत (Malegoan Municipal corporation) आज करोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे….

- Advertisement -

आज प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार, मालेगाव शहरात (Malegaon City) आज दोन करोनाबाधित रुग्ण (Covid Positive Patient) आढळून आले आहेत. तर जिल्हाबाह्य एक रुग्ण आणि नाशिक शहरात (Nashik city) एक बाधित रूग्ण आज आढळले आहेत. जिल्ह्यात करोनाचे अचानक चार रुग्ण आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे.

एकीकडे रुग्णसंख्या शून्याकडे वाटचाल करत असतानाच अचानक चार रुग्ण आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. लसीकरणाकडे अनेकांनी पाठ फिरवलेली आहे, दुसरीकडे बुस्टर डोस घेणाऱ्यांची संख्यादेखील बोटावर मोजण्याइतकी आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात ही आपत्ती संकटात आणू नये म्हणून प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

आज दिवसभरात दोन बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ८९९ रुग्ण करोना महामारीमध्ये दगावले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या