Thursday, April 25, 2024
Homeनगरकोविड काळात राहुरी विद्यापीठ प्रशासनाकडून नियमभंग

कोविड काळात राहुरी विद्यापीठ प्रशासनाकडून नियमभंग

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

पदभार स्वीकारताना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जंगी स्वागत सोहळ्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (Mahatma Phule Agricultural University) कुलगुरू डॉ.पाटील यांनी गर्दी जमवून कोविड नियमांचे उल्लंघन (Violation of covid rules) केले. या प्रकरणी संयोजकांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी केली आहे. अन्यथा आठ दिवसात राहुरी तहसील कार्यालयासमोर (Rahuri Tahsil Office) आमरण उपोषण करण्याचा इशारा (Hint) जाधव यांनी दिला आहे.

- Advertisement -

राहुरी प्रशासनाने (Rahuri administration) कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांना (Registrar of Agricultural University) याबाबत खुलासा मागितला असून कुलसचिवांनी तहसीलदारांच्या पत्राला सपशेल टाळल्याने जाधव यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात (High Court) जाणार असल्याचे सांगितले.

कुलगुरूंनी पदभार स्वीकारताना त्यांच्या स्वागत सोहळ्यात मोठी गर्दी जमविली असल्याचा आरोप जाधव यांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. निवेदनात म्हटले, कोविड काळात संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासन (State Government ) व जिल्हा प्रशासनाने (District administration) जमावबंदी आदेश जारी केला होता. मात्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील नानासाहेब पवार सभागृहात मध्यवर्ती परिसरासह 10 जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक या स्वागत सोहळ्याला उपस्थित होते.

सुमारे 300 हून अधिक जमाव या ठिकाणी हजर होता. त्यामुळे कोविड काळातील नियमांची पायमल्ली करण्यात आली. यात सोशल डिस्टन्सचा (Social Distance) फज्जा उडाला होता. स्वागत सोहळ्यानंतर काही दिवसातच अनेक ठिकाणी मोठा संसर्ग झाला. याबाबत राहुरीच्या तहसीलदारांकडे तक्रार (Complaint) करण्यात आली होती. त्यावरून तहसीलदारांनी विद्यापीठ प्रशासनाला चार पत्र पाठविली होती. त्यातील एकाही पत्राचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे तीन महिने उलटूनही कोविड नियमांची पायमल्ली करणार्‍या संयोजकांवर कारवाई (Action on the organizers) करण्यात आली नाही.

दरम्यान, कोविड काळात नियमांचे उल्लंघन करणार्‍या सामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, बड्या अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असल्याचा आरोप जाधव यांनी निवेदनात केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या