Tuesday, April 23, 2024
Homeनगरकोविड काळात राज्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले

कोविड काळात राज्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यात मागील 10 महिन्यात 12 हजार 719 अर्भक मृत्युमुखी पडले आहेत.

- Advertisement -

शहरी भागात अर्भक मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त असल्याची माहिती ‘समर्थन’ने माहितीच्या अधिकारात माहिती प्राप्त झाली आहे.

मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे व अकोला या 6 नागरीकरण झालेल्या जिल्ह्यात राज्याच्या तुलनेत 36.22% आहे. ही बाब गंभीर असून राज्याच्या आरोग्य व्यवस्थे विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. ग्रामीण दुर्गम आदिवासी भागात कुपोषण बालमृत्यूचे प्रमाण अधिक असताना शहरी भागात बालमृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे.

शासनाने जर वेळीच लक्ष दिले नाही तर प्रगत शहरातील स्थिती गंभीर होऊ शकते. याचे गांभीर्य ओळखून समर्थनने, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात राज्यातील जिल्ह्यात मागील 10 महिन्यात झालेले अर्भक मृत्यू त्याची कारणे, प्रगत जिल्ह्यातील वाढते अर्भक मृत्यूचे प्रमाण याची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच ही स्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी तात्काळ उपाय योजना करण्याची विनंती करण्यात आली आहे.

समर्थन या सामाजिक संस्थेने माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती नुसार मुंबई 1,097 अकोला (783), औरंगाबाद (729), नाशिक (664), नागपूर (587), पुणे (551), सिंधुदुर्ग (46), लातूर (78), वाशिम (89) मृत्यु झाले आहेत. कोरोनाचे संकट गंभीर असताना बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याने सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहे. एकीकडे ग्रामीण भाग कुपोषणाला सामोरे जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या