Friday, April 26, 2024
Homeनगरसंस्थानच्या चारही इमारतींत कोव्हिड सेंटर सुरू करा

संस्थानच्या चारही इमारतींत कोव्हिड सेंटर सुरू करा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी व परिसरात मोठ्या प्रमाणात करोना विषाणूंंचा फैलाव झालेला असून साईबाबा संस्थानच्या शिर्डी येथील कोव्हिड सेंटरमध्ये सुरू असलेली

- Advertisement -

एक इमारत यासाठी पुरेशी नसल्याने रुग्ण दाखल करून घेणे गैरसोयीचे होत असून साईबाबा संस्थानच्या पूर्वीप्रमाणे सुरू असलेल्या चारही इमारती पुन्हा कोव्हिड सेंटर म्हणून सुरू कराव्यात, अशी मागणी शिर्डी शहरातील महाविकास आघाडीच्यावतीने प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

शिर्डी शहर महाविकास आघाडीच्यावतीने बुधवार दि. 24 रोजी प्रांताधिकारी गोविंद शिंदे तसेच संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी व परिसरात मोठ्या प्रमाणात करोना विषाणूंंचा ़फैलाव झालेला असून साईबाबा संस्थानच्या शिर्डी येथील कोव्हिड सेंटरमध्ये सुरू असलेली एक इमारत यासाठी पुरेशी नसल्याने रुग्ण दाखल करून घेणे गैरसोयीचे होत आहे.

नाशिक, अहमदनगर तसेच परिसरातील कोव्हिड सेंटर पूर्ण क्षमतेने भरल्याने तेथे जागा उपलब्ध नाही. खाजगी कोव्हिड सेंटरमध्ये गोरगरीब रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिलामुळे उपचार घेणे जिकरीचे बनले आहे. सुरुवातीच्या काळात शिर्डी येथील कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो रुग्ण मोफत उपचार घेऊन घरी गेले आहेत. यामुळे अनेक रुग्णांचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत.

संस्थानचे कोव्हिड सेंटर उत्कृष्ट चहा, दूध, जेवण, चांगले डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी, स्वच्छता, यामुळे सर्व रुग्णांच्या पसंतीला उतरले आहे. अडचणीच्या काळात श्रीसाईबाबा संस्थानचा शिर्डी आणि परिसराला आधार आहे. करोना महामारीच्या काळात शिर्डीतील कोव्हिड सेंटर अत्यंत उपयुक्त ठरले होते, त्याचबरोबर आजही चांगल्याप्रकारे सुरू आहे. मधल्या काळात रुग्ण संख्या घटल्याने चार इमारती बंद करून एक इमारत सुरू ठेवण्यात आली होती.

परंतु आता करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. त्यामुळे बंद केलेल्या चार इमारती पूर्वीप्रमाणेच तातडीने कोव्हिड सेंटर म्हणून सर्व सुविधांसह खुल्या करणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टर, नर्स, कर्मचारी, औषधे, पीपीई किट, एन 95 मास्क व इतर साहित्य उपलब्ध करून द्यावेत. सद्यस्थितीमध्ये शिर्डीत लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शिर्डीत साईभक्तांची वर्दळ कमी झाल्याने येथील बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. व्यावसायिक अडचणीत आले आहेत, त्यातच करोनाने कहर सुरू केला आहे.

या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानच्या पूर्वीप्रमाणे सुरू असलेल्या चारही इमारती पुन्हा कोव्हिड सेंटर म्हणून सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेच्यावतीने कमलाकर कोते, काँग्रेस कमिटीचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, संजय शिंदे, सचिन कोते, विठ्ठल पवार, अक्षय तळेकर, पुंंडलिक बावके, सुयोग सावकारे, मदन मोकाटे, उमेश शेजवळ, प्रसाद पाटील, अमर गायकवाड, रमेश गागरे, सचिन गाडेकर,आरबाज कादरी, सुवर्णेश साबळे, संतोष वाघमारे, मोहसीन सय्यद, कृष्णा वाघमारे, आसिफ सय्यद, अनीस शेख, दीपक कोते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या