Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसावता नगर येथील कोविड सेंटर लवकरच सुरू होणार : नगरसेवक बडगुजर

सावता नगर येथील कोविड सेंटर लवकरच सुरू होणार : नगरसेवक बडगुजर

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

नवीन नाशकात करोनाचे रूग्ण वाढत असतांना उपचारा साठी कोविड सेंटर नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.

- Advertisement -

मनपा कडुन नवीन नाशकातील  प्रभाग क्रमांक २५ मधील सावतानगर येथील क्रॉमटन हॉल (सावरकर हॉल ) येथे ६० ऑक्सीजन बेड व रायगड चौक मनपा शाळेत १०० बेड असे १६० बेड चे कोविड सेंटर उभारण्याचे काम अंतीम टप्यात असुन येत्या काही दिवसांतच या कोविड सेंटर चे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती प्रभागाचे नगरसेवक शिवसेना महानगर प्रमुख स्थायी समिती सदस्य सुधाकर बडगुजर यांनी दिली.

शहरातील  सर्वाधिक करोना रुग्ण नवीन नाशिक परिसरातआहे. त्या मुळे हा परिसर करोना हॉट स्पॉट झाला आहे. मनपाचे शहरातील सर्व विभागात करोना रुग्णां साठी  कोवीड सेंटर आहे. परंतु नवीन नाशकात करोना रूग्ण असुनही कोविड सेंटर नव्हते, त्या मुळे परिसरातील सर्व सामान्य असलेले करोना रूग्णांना उपचारासाठी नाशकातील मनपाचे झाकीर हुसेन , नाशिकरोड भागातील बिटको हॉस्पिटल येथे जावे लागत होते.

कित्येकदा तेथील रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने नवीन नाशकतील रुग्णांना परत पाठविले जात होते. सर्व सामान्य रुग्णांना अखेर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते. मागील वर्षी करोना रुग्ण वाढल्या नतर नवीन नाशकात कोविड सेंटर उभारावे अशी  मागणी नागरिकांनी केली होती. परंतु रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर हा विषय मागे पडला.

सावता नगर भागात कोविड सेंटर उभारावे  व या सेंटर मध्ये ऑक्सीजन बेड,व्हेंटीलेटर बेड, आयसीयु विभाग   या सह सुविधा उपलब्ध करुन दयावे या मागणीचे निवेदन नागरिकांनी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना दिले. नगरसेवक बडगुजर यांनी मनपा प्रशासन व मनपा आयुकत यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले.

मनपा आयुकत यांनी या कोविड सेंटर ला मान्यता दिली. या नंतर मनपाचे अधिकारी, मनपा नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांनी सावतानगर येथील सावरकर हॉल व रायगड चौक येथील मनपा शाळेच्या सभागृहाची पहाणी केली.

या नंतर सावतानगर येथील क्रॉमटन हॉल (सावरकर हॉल) येथे ६० ऑक्सीजन बेड, आयसीयु विभाग व रायगड चौक मनपा शाळेत १०० बेड असे १६० बेड उभारण्याचे कामाला सुरूवात झाली आहे.

प्रभाग क्रमांक २५ मधील १६० बेडचे कोविड सेंटर चे येत्या काही दिवसांतच उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती प्रभागाचे नगरसेवक शिवसेना महानगर प्रमुख स्थायी समिती सदस्य सुधाकर बडगुजर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या