Saturday, May 11, 2024
Homeदेश विदेशदेशभरात करोनाचा कहर! गेल्या २४ तासात देशभरात सापडले 'एवढे' रुग्ण

देशभरात करोनाचा कहर! गेल्या २४ तासात देशभरात सापडले ‘एवढे’ रुग्ण

दिल्ली | Delhi

दोन वर्षांपासून देशावर करोनाचे (covid19) संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचे (corona update india) रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे करोनाचे संकट टळले असे वटत होते.

- Advertisement -

मात्र पुन्हा एकदा भारतात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यानं चिंता वाढली आहे. तर, ओमायक्रॉन (omicron) प्रकाराचे रुग्णही मोठ्या संख्येनं आढळत आहेत.

Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेच्या मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ

देशात गेल्या २४ तासांत करोनाच्या आढळून आलेल्या नवीन रुग्णांची संख्या आता २ लाखाच्या जवळ आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ९४ हजार ७२० इतके करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या कालच्या तुलनेत १५.८ टक्क्यांनी अधिक आहे. करोना मृत्युंची संख्याही वाढली आहे. गेल्या २४ तासांत ४४२ जणांना करोनाने मृत्यू झाला आहे.

PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

भारतात आतापर्यंत ३ कोटी ४६ लाख ३० हजार ५३६ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या पुन्हा एकदा करोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढत आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा ९.८२ टक्के इतका आहे. देशात सध्या ९ लाख ५५ हजार ३१९ सक्रीय रुग्ण आहेत. सध्याचा करोना रुग्ण वाढीचा दर ११.०५ टक्के इतका आहे.

आतापर्यंत देशात ६९.५२ कोटी जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर लसीकरणाची मोहिम वेगाने सुरु आहे. यात आजपर्यंत १५३ कोटी ८० लाख ८ हजार २०० डोस देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासात ८५ लाख २६ हजार २४० जणांना डोस देण्यात आला.

मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

शिवाय, देशातील ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron) चा संसर्गही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या ४ हजार ८६८ वर पोहोचली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र आणि राजस्थानमधील आहेत.

PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

- Advertisment -

ताज्या बातम्या