Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशकरोना लस : समितीची उद्या बैठक

करोना लस : समितीची उद्या बैठक

नवी दिल्ली | New Delhi –

भारतासाठी करोनावरील लस इतर देशांकडून तातडीने खरेदी करणे, प्राधान्यक्रम ठरविणे आणि तिचे वितरण करणे, यावर निर्णय घेण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीची बुधवारी (12 ऑगस्ट) महत्त्वाची बैठक होत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. Corona vaccine

- Advertisement -

सद्य:स्थितीत लस हाच करोना संकटातून मुक्ती मिळविण्याचा एकमेव पर्याय आहे. जगातील तीन ते चार लसी मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. सर्व काही सुरळीत झाले, तर सप्टेंबरपासून लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

ही तज्ज्ञ समिती सर्व राज्ये आणि लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा करणार आहे. लस टोचण्यात सहभागी होणार्‍या डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या