Wednesday, April 24, 2024
Homeनगर12 ते 14 वयोगटातील 3 हजार मुलांचे लसीकरण

12 ते 14 वयोगटातील 3 हजार मुलांचे लसीकरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी जून-जुलैमध्ये चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 12 ते 14 वयोगटातील मुलांना करोना प्रतिबंधक लस देण्याचे जाहीर केले असून बुधवारपासून (दि.16) हे लसीकरण सर्वत्र सुरू झाले आहे. नगर जिल्ह्यासाठी दीड लाख कोर्बेव्हॅक्स लसीचे डोस प्राप्त झाले आहेत.

- Advertisement -

चार दिवसांत 3 हजार 141 मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, 18 ते 44, 45 ते 59 आणि 60 च्या पुढील यांच्या लसीकरणाचा वेग मंदावला असल्याचे चित्र पहावास मिळत आहे. जिल्ह्यात आता सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत. करोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी सर्व वयोगटातील लसीकरण करण्याकडे शासनाचा भर आहे. याआधीच 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे.

आता केंद्र शासनाने बुधवारपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचाही यात समावेश केला असून त्यांना हैदराबादच्या बायोलॉजिकल ई. कंपनीची कोर्बेव्हॅक्स ही लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील 1 लाख 54 हजार मुले असून त्यांच्यासाठी कोर्बेव्हॅक्स लसीचे दीड लाख डोस प्राप्त झालेले आहे.

16 मार्च 2010 पूर्वी जन्मलेल्यांना कोर्बेव्हॅक्स लसीसाठी वयाची 12 वर्षे पूर्ण झाली पाहिजेत. 16 मार्च 2010 पूर्वी जन्मलेली मुले ही लस घेऊ शकतात. या लसीसाठी पूर्वीप्रमाणेच या मुलांना कोविन अ‍ॅप किंवा आरोग्य सेतू पवर नोंदणी करावी लागेल. यासाठी आधारकार्ड आवश्यक राहील. एका मोबाइल क्रमांकावर 4 जणांची नावे नोंदवता येतील. तसेच दुसरा डोस 28 दिवसांनंतर मिळेल. मुलांना ही लस शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, महानगरपालिकेचे लसीकरण केंद्र येथे मिळणार आहे. आपापल्या शाळेतही लस उपलब्ध करण्याबाबत शासनाचे प्रयत्न आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या