Thursday, April 25, 2024
Homeनगरकरोनातून बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांच्या जवळपास

करोनातून बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांच्या जवळपास

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जिल्ह्यात करोनामुक्तीची टक्केवारी 96.51 झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात करोनातून बरे होणार्‍या रुग्णाचे प्रमाण

- Advertisement -

हे 95 टक्क्यांच्या पुढे आहे. दरम्यान, शनिवारी नव्याने 232 करोना रुग्ण वाढले असून उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या ही 1 हजार 338 झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 74, खाजगी प्रयोग शाळेत केलेल्या तपासणीत 78 आणि अँटीजेन चाचणीत 80 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 23, कोपरगाव 4, नगर ग्रामीण 19, नेवासा 9, पारनेर 8, पाथर्डी 3, राहाता 1, संगमनेर 1, शेवगाव 2, श्रीरामपूर 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 29, अकोले 3, नगर ग्रामीण 6, नेवासा 4, पारनेर 5, राहाता 4, राहुरी 7, संगमनेर 17, श्रीरामपूर 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत काल 80 जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा 2, अकोले 2, जामखेड 2, कर्जत 7, कोपरगाव 10, नगर ग्रामीण 1, नेवासा 4, पारनेर 7, पाथर्डी 4, राहाता 9, राहुरी 1, संगमनेर 16, शेवगाव 14, श्रीगोंदा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 55, अकोले 18, जामखेड 2, कर्जत 5, कोपरगाव 17, नगर ग्रामीण 16, नेवासा 12, पारनेर 17, पाथर्डी 22, राहाता 43, राहुरी 6, संगमनेर 52, शेवगाव 11, श्रीगोंदा 15, श्रीरामपूर 15, कॅन्टोन्मेंट 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या