Saturday, April 27, 2024
Homeनगरकरोना संसर्ग पुन्हा वाढला

करोना संसर्ग पुन्हा वाढला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात बुधवारी 520 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्यांची संख्या आता 2 लाख 80 हजार 784 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.68 टक्के झाले आहे. दरम्यान, काल जिल्हयाच्या रुग्ण संख्येत 610 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 3 हजार 560 इतकी झाली आहे.

- Advertisement -

पारनेर तालुका पुन्हा जिल्ह्यात टॉपवर आला असून तालुक्यातील संसर्गाची साखळी तुटत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 55, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 189 आणि अँटीजेन चाचणीत 366 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 2, अकोले 1, नगर ग्रामीण 15, नेवासा 1, पारनेर 1, पाथर्डी 9, संगमनेर 21, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 1 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 7, अकोले 3, जामखेड 6, कर्जत 19, कोपरगाव 8, नगर ग्रामीण 14, नेवासा 22, पारनेर 32, पाथर्डी 2, राहता 14, राहुरी 8, संगमनेर 24, शेवगाव 14, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 13, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 366 जण बाधित आढळुन आले. मनपा 13, अकोले 19, जामखेड 19, कर्जत 47, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 16, नेवासा 26, पारनेर 60, पाथर्डी 51, राहता 8, राहुरी 7, संगमनेर 10, शेवगाव 13, श्रीगोंदा 39, श्रीरामपूर 3, कँटोन्मेंट बोर्ड 2 आणि इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 25, अकोले 24, जामखेड 16, कर्जत 39, कोपरगाव 11, नगर ग्रामीण 22, नेवासा 10, पारनेर 77, पाथर्डी 71, राहता 16, राहुरी 9, संगमनेर 112, शेवगाव 22, श्रीगोंदा 54, श्रीरामपूर 3, कँटोन्मेंट बोर्ड 2 आणि इतर जिल्हा 7 अशा रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या